रॉकेल वाटप प्रकरणी चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 01:24 AM2018-08-25T01:24:39+5:302018-08-25T01:25:44+5:30
तालुक्यातील नांदापूर येथे रॉकेल मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. त्याबाबत ‘लोकमतने’ १३ आॅगस्ट रोजी ‘रॉकेल मिळेना’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत तहसीलदारांनी नांदापूर व वारंगा फाटा येथील रॉकेल वाटप प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मंडळ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : तालुक्यातील नांदापूर येथे रॉकेल मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. त्याबाबत ‘लोकमतने’ १३ आॅगस्ट रोजी ‘रॉकेल मिळेना’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत तहसीलदारांनी नांदापूर व वारंगा फाटा येथील रॉकेल वाटप प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मंडळ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नांदापूर येथे रॉकेल विक्रेत्याने आठ महिन्यापासून रॉकेल वितरीत केली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदाराकडे केली आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांना रॉकेलची अत्यंत गरज असते. रॉकेल का मिळत नाही असे नांदापूर येथील दुकानदारास विचारले असता वरुन रॉकेल पुरवठा होत नसल्याचे कारण १३ आॅगस्ट रोजी विक्रेत्याने सांगीतले होते. त्यामुळे पाच महिन्यांचे रॉकेल गेले कुठे असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला होता.
या वृत्ताची दखल घेत अखेर तहसीलदारांनी नांदापूर येथे रॉकेल किती दिवसांपासून वाटप केले नाही. लाभ धारकांचे जवाब नोंदवून त्याची सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना बिटच्या मंडळ अधिकाºयांना दिल्या आहेत. तर वारंगा येथील अर्धघाऊक विक्रेत्यांनी किती दिवसांपासून नांदापूर येथील किरकोळ केरोसीन विक्रेत्यांना रॉकेल दिले नाही.
याबाबत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी वारंगा फाटा येथील मंडळ अधिकाºयाला दिल्या आहे. मागील आठ महिन्यापासून रॉकेल मिळाली नसल्याची तक्रार केली आहे. २३ आॅगस्ट रोजी नांदापूर येथील किरकोळ रॉकेल विक्रेता लाभर्थ्यांना रॉकेल वाटप करत असताना एकच गोंधळ उडाला व रॉकेल वाटप बंद करण्यात आले होते.
दरम्यान, रॉकेलचा तालुक्यात काळाबाजार सर्रास सुरू असल्याचे दिसत आहे.