कृषी सहायकाच्या निलंबनाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 11:21 PM2018-02-08T23:21:11+5:302018-02-08T23:21:25+5:30
शेततळ्यांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण न करणाºया कृषी सहायकांवर निलंबनाची कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला आहे. तर दोन कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यास आदेशित केल्याने कामे न करणाºया इतरांच्या उरातही धडकी भरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शेततळ्यांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण न करणाºया कृषी सहायकांवर निलंबनाची कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला आहे. तर दोन कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यास आदेशित केल्याने कामे न करणाºया इतरांच्या उरातही धडकी भरली आहे.
जलयुक्त शिवार योजनेच्या कामांबाबत जिल्हाधिकाºयांनी आज आढावा घेतला. यावेळी सीईओ एच.पी.तुम्मोड, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय लोखंडे, विभागीय वनाधिकारी केशव वाबळे, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाºयांनी २0१६-१७ ची कामे मार्चपर्यंत प्राधान्याने पूर्ण करण्याची कडक सूचना दिली. तर महसूलच्या उपविभागीय अधिकाºयांकडे समितीची सूत्रे असतानाही त्यांचा यात सक्रिय सहभाग दिसत नाही. त्यामुळे पुन्हा एक संधी देत असल्याचे सांगून यानंतर रडारवर घेण्याचा इशारा दिला. २0१७-१८ ची कामे जवळपास ५0 टक्क्यांपर्यंत आली असली तरीही उर्वरित कामे अजून सुरू नाहीत. त्यामुळे ती तत्काळ सुरू केल्यास जूनपर्यंत हा आराखडा पूर्ण करणे शक्य होईल, असे भंडारी यांनी सांगितले.
शेततळ्यांचे उद्दिष्ट पूर्ण न करणाºया कृषी सहायकांना जिल्हाधिकारी भंडारी यांनी चांगलेच धारेवर धरले. प्रत्येकाचा स्वतंत्र आढावा घेतला. यात ज्यांचे काम अतिशय संथ होते, अशांना २८ फेब्रुवारीची मुदत दिली. तर खोकले नामक कृषी सहायकाने एकही शेततळे न केल्याने निलंबनाचा आदेश काढण्यास सांगण्यात आले. तर बैठकीस गैरहजर राहणाºया सात ते आठ कृषी सहायकांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचा आदेश दिल्याचेही सांगण्यात आले. अडीच हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १३५0 पूर्ण झाले आहेत. प्रति कृषी सहायक २0 याप्रमाणे उद्दिष्ट होते. अनेकांनी दहापेक्षा जास्त कामे केली. यापेक्षा कमी काम करणाºयांची हजेरी घेण्यात आली.
कंत्राटदार काळ्या यादीत
संजीवनी कंस्ट्रक्शन नांदेड व व्ही.एस. लांडगे हिंगोली या दोन कंत्राटदारांनी डिग्रसवाणी व लासीना येथील प्रत्येकी दोन सिमेंट बंधाºयाची कामे केली नसल्याने त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा आदेशही जिल्हाधिकाºयांनी दिला. गेल्यावर्षीची ही कामे अद्याप सुरूच झाली नाहीत. तर कंत्राटदारांची बहाणेबाजी सुरू असल्याचे सांगितले जाते.