हिंगोलीतील चिमुकल्यांच्या मदतीसाठी सरसावल्या संघटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:12 AM2018-01-22T00:12:02+5:302018-01-22T00:12:31+5:30
वडिलाच्या मृत्यूने पोरक्या झालेल्या दोन चिमुरड्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी शिक्षक संघटना पुढे सरसावल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : वडिलाच्या मृत्यूने पोरक्या झालेल्या दोन चिमुरड्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी शिक्षक संघटना पुढे सरसावल्या आहेत.
हिंगोली तालुक्यातील खानापुर चिता येथील विद्यासागर विद्यालयातील शिक्षक शिवाजी सिताराम कोरडे यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यांना दोन मुली आहेत. परंतु कोरडे यांच्या मृत्यूमुळे दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे महात्मा फुले शिक्षण परिषद, महाराष्टÑ राज्य जि. प. कर्मचारी जुनी पेन्शन हक्क संघटना तसेच माळधामणी येथील शिक्षकांनी मुलींच्या शिक्षणासाठी मदतीचा हात दिला आहे. जुनी पेन्शन हक्क संघटनेने १ लाख रूपये, महात्मा फुले परिषदेतर्फे ५० हजार रूपये, माळधामणी येथील महात्मा गांधी विद्यामंदिरातील शिक्षकांनी ५ हजार ७०० रूपये अर्थसहाय्य केले आहे.