रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:18 AM2018-07-03T00:18:31+5:302018-07-03T00:18:48+5:30
यशस्वी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नलॉजी पूर्णतर्फे हिंगोली शहरालगतच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था लिंबाळा मक्ता परिसर येथे ५ जून रोजी आयटीआय उतिर्ण बेरोजगारांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : यशस्वी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नलॉजी पूर्णतर्फे हिंगोली शहरालगतच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था लिंबाळा मक्ता परिसर येथे ५ जून रोजी आयटीआय उतिर्ण बेरोजगारांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे.
आयटीआय उतिर्ण बेरोजगारांना पुणे येथील विविध ३६ कंपन्यामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर भरती मेळाव्यात कंपन्यामध्ये ५५० जागेसाठी निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. सदरील कंपन्या पुणे शहर परिसरात असून बहुत्येक कंपन्यामध्ये बस व उपहारगृहाची सुविधा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आयटीआय उतिर्ण विद्यार्थ्यांनी रोजगार भरती मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सं. प्र. भगत यांनी केले. ५ जून रोजी हिंगोली तालुक्यातील लिंबाळा परिसरात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणाऱ्या भरती प्रक्रियेत सहभागी होऊन रोजगाराच्या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन केले आहे.
इतर विद्यार्थ्यांनाही संधी
४दहावी, बारावी, डिप्लोमा ईन मॅकॅनिकल, बीएसी, बीसीए, एस.सी.केमेस्ट्री तसेच एमएससी मायक्रो उतिर्ण बेरोजगारांनाही या मेळाव्यात संधी उपलब्ध असल्याची माहिती प्राचार्य भगत यांनी दिली.त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अर्हतेची छायांकित प्रतीचा बंच, आधारकार्ड छायांकित प्रत व दोन पासपोर्ट फोटो सोबत घेऊन यावेत.