मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:36 AM2021-01-08T05:36:47+5:302021-01-08T05:36:47+5:30
कळमनुरी : मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त व दर्पण दिनाचे औचित्य साधून कळमनुरी तालुका व शहर मराठी पत्रकार संघ, ...
कळमनुरी : मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त व दर्पण दिनाचे औचित्य साधून कळमनुरी तालुका व शहर मराठी पत्रकार संघ, व्यापारी महासंघ व महालॅब हिंगोली यांच्या वतीने ८ जानेवारी रोजी सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत डॉ. सोमाणी कॉम्प्लेक्स येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात लिपीड प्रोफाइल, शुगर, थायरॉइड, किडनी, लिव्हर, सांधेदुखी, ईसीजी यासह अनेक अत्यंत महागड्या तपासण्या डॉ. नीलेश सोमाणी, डॉ. दिलीप मस्के, डॉ. सूरज राठोड यांच्या उपस्थितीत अगदी मोफत करण्यात येणार आहेत.
शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन नंदकिशोर तोष्णीवाल, चंद्रकांत देशमुख, गजानन खोतकर, तनवीर नाईक, नंदकिशोर सारडा, अलिमोद्दीन कादरी, सौरभ साकळे आदींनी केले आहे.