सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:19 AM2018-04-08T00:19:48+5:302018-04-08T00:19:48+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ८ ते १४ एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ८ ते १४ एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
लोकप्रतिनिधी व सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे कार्यक्रमाचे उदघाटन केले जाणार आहे. ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्यातील महाविद्यालये, शाळा, शासकीय वसतिगृहामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील लघुनाट्य, प्रश्नमंजूषा, वादविवाद स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. १० एप्रिल रोजी जिल्हास्तरावर रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी कार्यक्रम होईल. ११ एप्रिल सामाजिक न्याय व सर्व महामंडळामार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती व त्या अंतर्गत कजार्चे वाटपाबाबत लाभार्थ्यांना सविस्तर माहिती दिली जाणार आहे. १२ एप्रिल रोजी सर्व शासकीय कार्यालयामध्ये व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यामध्ये स्वयंसेवी संस्थाच्या साह्याने स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. १३ एप्रिल रोजी जिल्ह्यातील विचारवंत, नामवंत, पत्रकार, लोक कलावंत तसेच सामाजिक चळवळीतील प्रसिध्द व्यक्ती यांचे समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे व व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी ८.५० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादल कार्यक्रम होईल.
जिल्ह्यातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्याथीर्नी आणि नागरिकांनी सामाजिक समता सप्ताहमध्ये सहभागी होण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.