इतर मागास महामंडळाची थकबाकी ३५ लाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:54 PM2018-01-13T22:54:51+5:302018-01-13T22:54:56+5:30

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातर्फे कर्ज योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराकरिता अप्लव्याजदराने कर्ज वितरित करण्यात आलेले आहे. मात्र त्याची थकबाकी भरली जात नसून ३५.२४ लाखांवर थकबाकी गेली आहे.

 The other backward corporation's outstanding amount of 35 lakhs | इतर मागास महामंडळाची थकबाकी ३५ लाखांवर

इतर मागास महामंडळाची थकबाकी ३५ लाखांवर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातर्फे कर्ज योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराकरिता अप्लव्याजदराने कर्ज वितरित करण्यात आलेले आहे. मात्र त्याची थकबाकी भरली जात नसून ३५.२४ लाखांवर थकबाकी गेली आहे.
थकीत वसुलीबाबत सचिव विमुक्त जांती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग, कल्याण विभाग, मंत्रालय यांच्या दालनात बैठक झाली. त्यात हिंगोली जिल्ह्याचा आढावा घेतला असता एकूण ३५.२४ लक्ष रुपये इतकी असल्याने थकबाकी असल्याचे आढळून आले. त्यामुळे ही रक्कम लाभार्थी, किंवा त्यांचे जामीनदार हमीपत्र/पगारपत्रधारकाचे वेतनातून कपात करण्याचा आदेश दिला आहे. त्यातूनही काही निष्पन्न होत नसल्यास गहाणखत (कर्ज बोजा नोंद उतारे) इत्यादीच्या आधारे दिवाणी दावे, फौजदारी खटले, महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 मधील तरतुदीनुसार आर. आर. सी. इत्यादी अंतर्गत कारवाई करून वसुली करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.
त्यानुसार महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून कायदेशिर कार्यवाही करण्याचे कामकाज चालू झालेले आहे. यात थकबाकीदारांना ३१ मार्च, २0१८ पर्यंत थकीत व्याज रक्कमेवर २ टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याचा लाभ घेऊन लाभार्थ्यांनी थकीत मुद्दल व व्याज रक्कम एकरक्कमी भरून व कायदेशीर कारवाई टाळावी, असे जिल्हा व्यवस्थापक अरुण एस. समुद्रे यांनी कळविले आहे.

Web Title:  The other backward corporation's outstanding amount of 35 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.