...अन्यथा इच्छामरणास परवानगी द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:01 AM2019-01-10T01:01:54+5:302019-01-10T01:02:21+5:30
औंढा तालुक्यातील गलांडी लघुसिंचन तलावाच्या लाभ क्षेत्रातील जनविकास पाणी वापर सहकारी संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडुन रितसर परवानगी मिळविल्यानंतर तहसीलदारांनी पाणी रोखल्याने तलावातील पाणी द्या अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या असे निवेदन जिल्हाधिकाºयांकडे देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : औंढा तालुक्यातील गलांडी लघुसिंचन तलावाच्या लाभ क्षेत्रातील जनविकास पाणी वापर सहकारी संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडुन रितसर परवानगी मिळविल्यानंतर तहसीलदारांनी पाणी रोखल्याने तलावातील पाणी द्या अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या असे निवेदन जिल्हाधिकाºयांकडे देण्यात आले आहे.
या तलावात ५५ टक्के म्हणजेच ०.१८७ दलघमी पाणीसाठा आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ०.०२० बाष्पीभवनात मार्चअखेर २० टक्के म्हणजे ०.०३३, उन्हाळी बाष्पीभवनासाठी ३० टक्के म्हणजेच ०.४०, सदर तलावातील गाळ २५ टक्के म्हणजेच ०.०४६ दलघमी इतका जादा पाणीसाठा असल्याने एकूण ०.०४७ दलघमी पाणी सिंचनासाठी वापरण्यास परवानगी दिली. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकाºयांना १९ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण अधिकाºयांनी कळविले होते. यानंतर तहसीलदारांनी गलंडी सिंचन तलावातून पाणी रोखले. ४ जानेवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकाºयांच्या स्वाक्षरीत लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी पत्र दिले. तरीही पाणी मिळत नसल्याने आज जिल्हाधिकाºयांची भेट घेण्यासाठी २० शेतकरी दाखल झाले होते. मात्र त्यांची भेट न झाल्याने पाणी द्या अन्यथा इच्छामरणाची परवानगी अशा आशयाचे निवेदन देत आपल्या व्यथा अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांच्याकडे मांडल्या. यात प्रकाश शिवलाल चव्हाण, धोंडीराज किशन देव, नागनाथ भीमाशंकर पवार, धनंजय महामुने, विश्वनाथ साबळे, रंजनाताई पवार, एकनाथ शेळके, अशोक चव्हाण, प्रमोद देव, चंद्रप्रकाश साहेबराव, दिनकर कºहे, शाम देव, किशन पवार आदींच्या सह्या आहेत.