...अन्यथा गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:51 AM2018-03-01T00:51:37+5:302018-03-01T00:51:41+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार पुरता ढेपाळला आहे. ‘लोकमत’ने जिल्हा सामान्य रुग्णालयाची खरेदीच बाबूगिरीच्या जाळ्यात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आज अचानक भेट देऊन आढावा घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार पुरता ढेपाळला आहे. ‘लोकमत’ने जिल्हा सामान्य रुग्णालयाची खरेदीच बाबूगिरीच्या जाळ्यात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आज अचानक भेट देऊन आढावा घेतला. बांधकाम एका महिन्यात पूर्ण न केल्यास संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याच आदेशित केले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रशासकीय अनागोंदीमुळे कारभार ढेपाळलेला आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांचे डॉक्टर अन् कर्मचारीही काहीच ऐकत नसल्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. त्यातच इमारतीचे बांधकामाची मुदतही संपूनही काम पूर्ण होत नसल्याने रुग्णांसह डॉक्टरांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे एका महिन्यात बांधकाम पूर्ण करुन देण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय, तशा तारखाही लिहून घेतल्या आहेत. या कालावधीत बांधकाम पूर्ण न झाल्यास संबंधित कंत्राटदारावर ३५३ कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन घेण्याच्याही सूचना पोलीस प्रशासनास दिल्या. संपूर्ण बांधकामाचा आढावा घेतला. तसेच सर्वच वॉर्डातील बाथरुमची पाहणी करून येत्या पंधरा दिवसांत दुरुस्ती करण्यास सांगितले. तर एका महिन्यात या इमारतीतील एकही काम शिल्लक राहणार नाही, याची काळजी घ्या. मजल्यावरील विविध विभागांची ओपीडी सुरू करण्यास सांगितले. तर औषधींच्याही प्रश्नावर लक्ष केंद्रित करुन शासनाच्या नियमानुसार औषधी खरेदी करण्याच्या सूचना दिल्या. रुग्णालयाच्या पाठीमागील सुलभ शौचालय सुरु करुन ते विनाशुल्क सुरु देण्यासही सांगितले. यावेळी कार्यकारी अभियंता देशपांडे, शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. गोपाल कदम आदींची उपस्थिती होती.
पोलिसांत केली नोंद
४येथील रुग्णालयाचे बांधकाम संथ गतीने करणाºया कंत्राटदारास ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी पोलिसांना सूचना दिल्या होत्या. परंतु येत्या पंधरा दिवसांत काम पूर्ण करुन देण्याची हमी कंत्राटदाराने दिल्याने तशी नोंदणी शहर पोलिसांत केल्याचे पोउपनि तान्हाजी चेरले यांनी सांगितले.