नागाच्या १७ अंड्यांतून निघाले १६ पिल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:34 AM2021-07-14T04:34:56+5:302021-07-14T04:34:56+5:30
शहरातील रामाकृष्ण भागात महिनाभरापूर्वी एक नाग जातीचा साप आढळून आल्याची माहिती समजल्यावर सर्पमित्र त्या ठिकाणी गेले होते; परंतु नाग ...
शहरातील रामाकृष्ण भागात महिनाभरापूर्वी एक नाग जातीचा साप आढळून आल्याची माहिती समजल्यावर सर्पमित्र त्या ठिकाणी गेले होते; परंतु नाग न सापडता त्या ठिकाणी १७ अंडी आढळून आली. त्यावेळी सर्पमित्राने एका कुंडीत ही अंडी ठेवून त्याचे जतन केले. ३२ दिवसांनी त्या अंड्यांतून १६ पिल्ले बाहेर आली आहेत. याबाबत पटवेकर यांनी वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली अंड्यांचे संगोपन केले होते. त्यानंतर आता वन अधिकाऱ्यांना माहिती दिली असून नागाची पिल्ले जंगलात नेऊन सोडण्यात आली आहेत. कोणताही साप असो नागरिकांनी त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी, असे आवाहनही वन विभागाने केले आहे.
साप हा अनादिकाळापासून शेतकऱ्यांचा मित्र आहे म्हणूनच या सापांना वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये संरक्षण दिले आहे. त्यामुळे सापाला मारणे, छेडणे, त्याचे फोटो काढून प्रसारमाध्यमांवर प्रसारित करणे तसेच स्टंटबाजी करणे हा या कायद्याने गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. यासाठी दहा ते पंचवीस हजार रुपये दंड किंवा तीन ते सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
-विश्वनाथ टाक, प्रभारी सहायक वन संरक्षक.
फोटो २२