जिल्ह्यातील २६ लघुतलावांपैकी ११ तलाव शंभर टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:33 AM2021-08-24T04:33:24+5:302021-08-24T04:33:24+5:30

हिंगोली: जून ते ऑगस्टपर्यंत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील २६ तलावांपैकी ११ लघुतलाव शंभर टक्के, तर ७ तलाव ५० टक्के ...

Out of 26 small lakes in the district, 11 lakes are 100 percent full | जिल्ह्यातील २६ लघुतलावांपैकी ११ तलाव शंभर टक्के भरले

जिल्ह्यातील २६ लघुतलावांपैकी ११ तलाव शंभर टक्के भरले

googlenewsNext

हिंगोली: जून ते ऑगस्टपर्यंत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील २६ तलावांपैकी ११ लघुतलाव शंभर टक्के, तर ७ तलाव ५० टक्के भरले गेले आहेत.

जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये सिंचन व्यवस्थापक उपविभागाच्या वतीने शेतकऱ्यांना पाणी वेळेवर पाणी मिळावे यासाठी लघुतलावांची निर्मिती केली आहे. जून ते ऑगस्टपर्यंत झालेल्या पावसामुळे २६ तलावांपैकी ११ तलाव शंभर टक्के भरले आहेत. यामध्ये सेनगाव तालुक्यातील सवना, बाभूळगाव, घोरदरी, वसमत तालुक्यातील राजवाडी, औंढा तालुक्यातील सुरेगाव, पिंपळदरी, औंढा, वाळकी, काकडदाभा, हिंगोली तालुक्यातील सवड, तर कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी तलावाचा समावेश आहे. तर हदगाव, पिंपरी, मरसूल, शेंदूरसना, पुरजळ, केळी हे तलाव ७५ टक्केच्या वर आहेत. यामध्ये हिरडी तलाव अद्यापही जोत्याच्या खाली आहे. पारोळा, वडद, पुरजवळा, वंजारवाडी, दांडेगाव, देवदरी आणि बोथी हे लघुतलाव ५० टक्क्यांच्या खाली आहेत.

असे भरले तलाव...

१०० टक्क्यांच्या वर ११

७५ टक्क्यांच्या वर ६

५० टक्क्यांच्या खाली ८

जोत्याखाली १

जिल्ह्यातील २६ लघुतलावांपैकी ११ तलाव हे तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे शंभर टक्के भरले आहेत. शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर केवळ पिकांकरिताच करावा. इतर वेळी पाण्याचा वापर करू नये. जेणेकरून पाण्याचा अपव्यय होणार नाही.

- व्ही. बी. पत्की, उपविभागीय अधिकारी, सिंचन व्यवस्थापन, उपविभाग क्र. ३

फोटो १०

Web Title: Out of 26 small lakes in the district, 11 lakes are 100 percent full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.