बियाणांसाठी २८ हजार अर्जांतून ७९३४ शेतकऱ्यांचेच नशीब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:22 AM2021-06-05T04:22:38+5:302021-06-05T04:22:38+5:30

या योजनेत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचा होता. यात अनुदानित बियाण्यांसह पीक प्रात्यक्षिक, मिनी किट आदींसाठीही अर्ज मागविण्यात आले ...

Out of 28,000 applications for seeds, only 7934 farmers got lucky! | बियाणांसाठी २८ हजार अर्जांतून ७९३४ शेतकऱ्यांचेच नशीब!

बियाणांसाठी २८ हजार अर्जांतून ७९३४ शेतकऱ्यांचेच नशीब!

Next

या योजनेत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचा होता. यात अनुदानित बियाण्यांसह पीक प्रात्यक्षिक, मिनी किट आदींसाठीही अर्ज मागविण्यात आले होते. प्रमाणित बियाणांमध्ये सर्वाधिक २८ हजार अर्ज आले होते, तर पीक प्रात्यक्षिकसाठीही ११ हजार ९०४ अर्ज होते. यातील १३९५ जणांना लाभ मिळणार आहे. नुकतीच लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड झाली आहे. ज्यांना लाभ मिळाला नाही, अशांना आता पूर्ण रक्कम अदा करून बियाणे खरेदी करावे लागणार आहेत. त्यामुळे शासनाने नुसतेच अर्ज भरायला लावून तोंडाला पाने पुसल्याची भावना व्यक्त होत आहे. यात सोयाबीन, तूर, उडीद व मूग हे बियाणे प्रतिकिलो बारा रुपये अनुदानावर मिळणार आहे.

निवडलेले प्रमाणित बियाणे लाभार्थी

हिंगोली-१७०८

सेनगाव-२०३४

वसमत-१२६४

कळमनुरी-९१६

औंढा-२०१२

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानअंतर्गत

पीक प्रात्यक्षिक-

महाडीबीटीवर अर्ज प्राप्त संख्या - ११९०४

महाडीबीटीवर निवड लाभार्थी संख्या-१३९५

2)महाडीबीटी प्रमाणित बियाणे वितरण संख्या-२८४३०

महाडीबीटीवर निवड लाभार्थी संख्या-७९३४

महागडे बियाणे कसे परवडणार?

अनुदानित बियाणांची लॉटरी लागली नाही

अनुदानित बियाणे मिळावे यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केला होता. लॉटरीत नाव येईल, असे वाटले होते. मात्र, ते आले नसल्याने नाराजी झाली. आता महागडे बियाणे खरेदी करावे लागेल.

-विनायक माखणे, शेतकरी.

वाढीव उद्दिष्ट दिले पाहिजे होते

मागील काही वर्षांपासून शेतकरी कोरडा व ओला दुष्काळ सातत्याने सोसत आहे. शासनाने वाढीव उद्दिष्ट देऊन अनुदानावर बियाणे दिले पाहिजे, तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

उकंडी हटकर, शेतकरी.

अनुदान तोकडे मात्र बियाणे भरवशाचे

महाडीबीटीवर अर्ज करूनही बियाणे न मिळाल्याने पदरी निराशा पडली. यात अनुदान तोकडे आहे. मात्र, बियाणे भरवशाचे मिळेल म्हणून अर्ज केला होता. त्यातही नशिबाने दगा दिला.

देवीदास राऊत.

Web Title: Out of 28,000 applications for seeds, only 7934 farmers got lucky!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.