वर्षभरात रुग्णालयात १३६ बालके दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 11:05 PM2018-07-29T23:05:53+5:302018-07-29T23:06:15+5:30
आरोग्य विभागाच्या वतीने बाल मृत्युचे प्रमाण रोकण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र ह्या महत्वकांक्षी योजना ग्रामीण भागात पोहोचत नसल्याने अजूनही बाल मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. जिल्हासामान्य रुग्णालयात वर्षभरात तब्बल १३६ बालकांचा जन्मताच मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आरोग्य विभागाच्या वतीने बाल मृत्युचे प्रमाण रोकण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र ह्या महत्वकांक्षी योजना ग्रामीण भागात पोहोचत नसल्याने अजूनही बाल मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. जिल्हासामान्य रुग्णालयात वर्षभरात तब्बल १३६ बालकांचा जन्मताच मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे.
एन. आर. एच. एम.च्या माध्यमातून गरोदर मातांसाठी राष्टÑीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत काळजी घेतली जाते. त्यामुळे हा कार्यक्रम गरोदर मातांसह बालकांसाठी एक प्रकारची संजीवनीच आहे. या कार्यक्रमांतर्गत गरोदर मातांची प्रसुती झाल्यानंतरही तिच्यासह तिच्या बाळाची काळजी घेतली जाते. यामध्ये जवळपास ० ते १८ वयोगटापर्यंतच्या बालकांची तपासणी केली जाते. तसेच बाल सुदृढ जन्माला यावे यासाठी विविध योजनेंतर्गत गरोदर मातांना पोषण आहारही पुरविला जातो. तसेच गरोदर मातांची प्रसुती जवळच्या रुग्णालयातच व्हावी यासाठीही यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे. प्रसुती झाल्यानंतरही सदरील माता व चिमुकल्यासह नातेवाईकांना त्यांच्या घरी पोहोचविले जाते. एवढ्या सर्व सुविधा दिल्या जात असल्या तरीही जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्षभरात १३६ बालकांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी एप्रिल ते मार्च २०१७-२८ मध्ये ५ हजार ९३७ बालकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३ हजार ९६ मुले तर २ हजार ८४१ मुलींचा जन्म झाला आहे. तर २.५ पैक्षा ११०० बालकांचा जन्म झाला आहे. बालकांचे कमी वजन व मृत्यूचे प्रमाण रोकण्यासाठी प्रयत्न कुठे होत आहेत? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. त्यातच गरोदर मातांना १०८ क्रमांकाच्या अपघाती रुग्णवाहिकेचाही लाभ मिळत आहे. तरीही बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी पाहिजे तेव्हढे यश येत नसल्याचे चित्र आहे. आता जिल्ह्यात १३२ एम. बी. बी. एस डॉक्टरांची पदे भरण्यात येत आहेत. त्यामुळे तरी कुठे बालमृत्यूंचा आकडा शुन्य होऊ शकतो.
जिल्हासामान्य रुग्णालयात गरोदर मातांची काळजी घेतली जाते. या ठिकाणी पुर्वी गरोदर मातांची हेळसांड होत होती. उपचारासाठी आलेल्या मातांना खाट मिळत होते तर कधी उपचाराविनाच वापस जाण्याची वेळ येत होती. हे सर्व टाळण्यासाठी रुग्णालयात ११ मे पासून अति जोखमींच्या गरोदर
मातांसाठी स्वतंत्र वातानुकुलीत कक्ष बनविला आहे. यामध्ये एकाच वेळी चार अति जोखमींच्या गरोदर मातांवर उपचार करता येऊ शकतात. अवघ्या तीन महिन्यांत २०० च्यावर मातांना या कक्षाचा लाभ मिळाला आहे.
रुग्णालयात येणाऱ्या गरोदर मातांची रुग्णालयाच्यावतीने काळजी घेतली जाते. या महिलांसाठी स्वतंत्र परिचारीकांची नियुक्तीही केली असून, गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्यावतीने सांगितले.