दोन जणांची कोरोनावर मात; तरी महिनाभरापासून रुग्णालयात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:21 AM2021-07-20T04:21:13+5:302021-07-20T04:21:13+5:30

शहरातील जिल्हा रुग्णालयात सद्य:स्थितीत एकही कोरोनाचा रुग्ण नाही. पण दुसरीकडे औंढा रोडवरील कोरोना सेंटरमध्ये ९ रुग्ण सद्य:स्थितीत असून त्यातील ...

Overcame two corona; Although in the hospital for a month! | दोन जणांची कोरोनावर मात; तरी महिनाभरापासून रुग्णालयात!

दोन जणांची कोरोनावर मात; तरी महिनाभरापासून रुग्णालयात!

Next

शहरातील जिल्हा रुग्णालयात सद्य:स्थितीत एकही कोरोनाचा रुग्ण नाही. पण दुसरीकडे औंढा रोडवरील कोरोना सेंटरमध्ये ९ रुग्ण सद्य:स्थितीत असून त्यातील दोन रुग्णांनी कोरोना महामारीवर यशस्वीपणे मात केली आहे. परंतु, श्वसनाच्या आजारामुळे त्यांना इतरत्र हलताही येत नाही. परिणामी गत महिनाभरापासून ते दोन रुग्ण औंढा रोडवरील रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या त्या दोन रुग्णांची प्रकृती चांगली असल्याचेही डाॅक्टरांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात २१० सध्या बेड आहेत तर औंढा रोडवरील रुग्णालयात सध्या ९० बेड आहेत. औंढा रोडवर रुग्णांची काळजी घेण्यासाठी १० वैद्यकीय अधिकारी असून त्यांच्या मदतीला २० परिचारिका कार्यरत आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांची सकाळ, संध्याकाळी पुरेपूर काळजी घेतली जात असल्याचेही या रुग्णालयातील डाॅक्टरांनी सांगितले.

औंढा रोडवरील रुग्णालयात सद्य:स्थितीत नऊ रुग्ण दाखल आहेत. यापैकी दोघांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु, महिनाभरापासून त्यांना श्वसनाचा आजार आहे. सध्या त्यांच्यावर उपचारही सुरु आहेत. कोरोनापासून दूर राहायचे असेल तर मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक आंतर या त्रिसूत्रीचा नागरिकांनी उपयोग करुन घ्यावा. म्हणजे कोरोनाबरोबर इतर कोणताच आजार आपल्याजवळ येणार नाही.

- डाॅ. संजय नाकाडे, वैद्यकीय अधिकारी

श्वसनाच्या आजाराचे दोन रुग्ण

औंढा रोडवरील रुग्णालयात एकूण नऊ रुग्ण सद्य:स्थितीत दाखल आहेत. यापैकी दोन रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. परंतु, त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांच्यावर दवाखान्यात राहण्याची वेळ येवून ठेपली आहे. सध्या त्या दोघांची प्रकृती चांगली आहे.

कोरोनातून बरा, पण श्वसनाचा त्रास सुरु

औंढा रोडवरील ‘त्या’ दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली. परंतु, श्वसनाचा आजार सुरु झाल्यामुळे त्यांना कोणतीच हालचाल करता येत नाही.

सद्य:स्थीतीत ‘त्या’ रुग्णांची चांगल्या पद्धतीने देखरेखही केली जात आहे. तज्ज्ञ डाॅक्टर मंडळी त्या रुग्णांना वेळेवर औषधी देत आहेत.

बरे झाल्यानंतरही घ्या काळजी....

कोरोना महामारीतून बरे झाल्यानंतर इतरत्र न फिरता एकाच जागी विश्रांती घेणे गरजेचे आहे. सकाळच्यावेळी प्राणायाम करावा तसेच सात्वीक आहारावर जास्त भर द्यावा. एखाद्या आजाराचा जास्त त्रास होत असेल तर फॅमिली डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डाॅ. गायत्री मुलंगे यांनी सांगितले.

Web Title: Overcame two corona; Although in the hospital for a month!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.