संत नामदेव नगरीत आवतरली पंढरी; दर्शनाचा प्रथम लाभ मिळाला दोन दांपत्यांना

By यशवंत भीमराव परांडकर | Published: June 29, 2023 12:43 PM2023-06-29T12:43:32+5:302023-06-29T12:44:14+5:30

भाविकांची दर्शनासाठी नर्सी येथे रांग लागली असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Pandhari returned to Saint Namdev city; Two couples got the first benefit of Darshana | संत नामदेव नगरीत आवतरली पंढरी; दर्शनाचा प्रथम लाभ मिळाला दोन दांपत्यांना

संत नामदेव नगरीत आवतरली पंढरी; दर्शनाचा प्रथम लाभ मिळाला दोन दांपत्यांना

googlenewsNext

- बापूराव इंगोले
नर्सी नामदेव (जि. हिंगोली):
श्री क्षेत्र असलेल्या संत नामदेवांच्या नर्सी नगरीत आषाढी एकादशीनिमित्त  पूजेचा पहिला मान दोन दांपत्यांना मिळाला. गुरुवारी दर्शनासाठी नर्सी येथे रांग लागली असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. 

रांगेत उभ्या असलेल्या प्रथम भाविकांना दर्शनाचा लाभ देण्याची परंपरा अनेक वर्षापासूनची आहे. २९ जून रोजी नामदेव व विठ्ठलाच्या पूजा करण्याचा मान कल्पना गणेश तडस व गंगाबाई माधव वानखेडे या दोन दांपत्यांना मिळाला. भाविकांची संख्या लक्षात घेता अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांनी नामदेव मंदिर येथे भेट देऊन पाहणी केली.

यावेळी नर्सी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अरुण नागरे, किशोर पोटे, संस्थानचे सचिव द्वारकादास सारडा, विश्वस्त भागवत सोळंके, रमेश महाराज मगर, उपसरपंच ज्ञानेश्वर कीर्तनकार, दत्ता वरणे आदी उपस्थित होते. दरवर्षी संत नामदेवांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या नर्सी येथे आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी हजारो संख्येने भाविक येतात.

Web Title: Pandhari returned to Saint Namdev city; Two couples got the first benefit of Darshana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.