शहरातून जाणारी पार्सल दारू ग्रामीण पोलिसांनी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:38 AM2021-01-08T05:38:41+5:302021-01-08T05:38:41+5:30
वसमत : ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात वसमत शहरातून दुचाकीवरून ग्रामीण भागात पार्सल दारू जाण्याचे प्रमाण वाढले आहे. वसमत शहरातून जाणारी ...
वसमत : ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात वसमत शहरातून दुचाकीवरून ग्रामीण भागात पार्सल दारू जाण्याचे प्रमाण वाढले आहे. वसमत शहरातून जाणारी पार्सल दारू दुचाकीसह ग्रामीण पोलिसांनी जप्त केली. यावेळी दुचाकी व दारू असा ३७ हजार ८६० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षकांनी वसमत येथे भेट देवून २४ तास उलटले नाहीत तोच पार्सल घेवून जाणाऱ्या दुचाकी वसमत शहरातून सुसाट धावत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात वसमत शहरातून अवैधरित्या दारू ग्रामीण भागात जात आहे. मात्र, वसमत शहर पोलीस, एलसीबीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि यांनी ग्रामीण हद्दीत अवैध दारू घेवून जाणाऱ्या वाहनांची धरपकड सुरू केली आहे. वसमत शहरातून परभणी रस्त्याने दुचाकीवरून दारू घेवून जाणारी दुचाकी पकडली. यात विदेशी दारूच्या बाटल्या व दुचाकी असा ३७ हजार ८६० रुपयांचा ऐवज जप्त केला. सपोनि विलास चवळी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी कपिल राजभोज (रा. कातनेश्वर) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फोटो नं.