हिंगोली येथे द्वितीय मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:02 AM2018-11-19T00:02:26+5:302018-11-19T00:02:44+5:30
हिंगोली शहरातील जिल्हा परिषद मैदानावर १८ नोव्हेंबर रोजी उडान सोशल अक्टीव्हीटी ग्रुपच्या वतीने द्वितीय हिंगोली मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : हिंगोली शहरातील जिल्हा परिषद मैदानावर १८ नोव्हेंबर रोजी उडान सोशल अक्टीव्हीटी ग्रुपच्या वतीने द्वितीय हिंगोली मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला.
हिंगोली येथील जिल्हा परिषद मैदान येथून उडान सोशल अक्टीव्हीटी ग्रुपच्या वतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेस हिरवा झेंडा दाखवून सुरूवात करण्यात आली. यावेळी अशोक अग्रवाल, गणेश वाघ, डॉ. सत्यनारायण तापडिया, डॉ. श्रीधर कंदी यांच्यासह स्पर्धक.
स्पर्धेचे सहआयोजक क्लासीक टीव्हीएस हिंगोली व तापडिया ट्रेडर्स हे होते. सदर स्पर्धा तीन गटात आयोजित करण्यात आली होती. महिला गटामध्ये १८ ते ४० तीन कि.मी. धावणेमध्ये कोमल मदन जाधव हिंगोली व ४० ते ६० वयोगटामध्ये अॅड. अश्विनी शहा हिंगोली, तसेच पुरूष गटामध्ये १८ ते ४० वयोगटात कृष्णा पांडुरंग माने परभणी, द्वितीय किरण गवते हिंगोली, तसेच ४० ते ६० वयोगटात सूर्यकांत शंकर खाडे प्रथम, द्वितीय अतुल बोरकर, तृतीय दिनेश होकर्णे व प्रा.सुरेंद्र साहू हिंगोली, ६० व त्यापुढील वयोगटात किरण लाहोटी हिंगोली प्रथम, द्वितीय विष्णू नरसय्या मुदीराज हिंगोली यांना देण्या आले. सदर स्पर्धेत हजारोच्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. प्रशासकीय अधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.