मंडळ अधिकाऱ्याच्या कारवाईला झुगारून वाळू चोरटे पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:30 AM2021-05-26T04:30:46+5:302021-05-26T04:30:46+5:30

हिंगोली तालुक्यातील खेर्डा शिवारातील पैनगंगा नदी परिसरातून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मंडळ अधिकारी खंडेराव नागोराव पोटे यांना ...

Pass the sand thief by thwarting the action of the board officer | मंडळ अधिकाऱ्याच्या कारवाईला झुगारून वाळू चोरटे पसार

मंडळ अधिकाऱ्याच्या कारवाईला झुगारून वाळू चोरटे पसार

Next

हिंगोली तालुक्यातील खेर्डा शिवारातील पैनगंगा नदी परिसरातून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मंडळ अधिकारी खंडेराव नागोराव पोटे यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी खेर्डा शिवारात पाहणी केली असता विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर व ट्राॅलीतून (एमएच ३७ ए ७८७५) पाच हजार रुपये किमतीची वाळू आढळून आली. ट्रॅक्टरला थांबविण्याचा प्रयत्न केला असता धुडगूस घालत ट्रॅक्टरचालक व सोबतच्या एकाने ट्रॅक्टर घेऊन पसार झाले. याप्रकरणी मंडळ अधिकारी खंडेराव नागोराव पोटे यांच्या फिर्यादीवरून प्रताप पंडितराव गडदे, चालक पवन प्रताप गडदे (दोघे रा. खेर्डा) यांच्या विरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, सपोनि राजेश मलपीलू, हवालदार पोले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपास पोले करीत आहेत.

Web Title: Pass the sand thief by thwarting the action of the board officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.