हिंगोली स्थानकात बस शोधताना प्रवाशांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:31 AM2021-08-23T04:31:47+5:302021-08-23T04:31:47+5:30
कोरोना संसर्ग कमी झाल्याने एसटी महामंडळाने लांब पल्ल्यासह ग्रामीण भागातही बसेस सुरू केल्या आहेत. हिंगोली आगारासह इतर जिल्ह्यातून हिंगोली ...
कोरोना संसर्ग कमी झाल्याने एसटी महामंडळाने लांब पल्ल्यासह ग्रामीण भागातही बसेस सुरू केल्या आहेत. हिंगोली आगारासह इतर जिल्ह्यातून हिंगोली मार्गे धावणाऱ्या बसेसची संख्याही मोठी आहे. त्यामुळे येथील बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ राहत आहे. रक्षाबंधन सण लक्षात घेता २१ व २२ ऑगस्ट रोजी बसेसला मोठी गर्दी होती. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेससह हिंगोली आगारातून सुटणाऱ्या बसेस प्रवाशांनी भरून जात होत्या. रविवारी येथील बसस्थानकात दिवसभर प्रवाशांची वर्दळ होती. मात्र, बसस्थानकात कुठेही बसेस उभ्या केल्या जात होत्या. त्यामुळे प्रवाशांना चांगलीच धावपळ करावी लागत होती. अनेकांना तर बस निघून गेलेलीही समजत नव्हती. त्यात काही बसेस उशिराने धावत असल्याचे दिसून आले. यामुळे प्रवशांना ताटकळत थांबावे लागत होते.
तात्पुरत्या प्रवासी निवाऱ्यातह साचला चिखल
प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी येथे अद्ययावत बसस्थानक उभारण्यात आले आहे. मात्र, अद्याप हे बसस्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात आले नाही. तोपर्यंत तात्पुरता निवारा उभारण्यात आला आहे. या प्रवासी निवाऱ्यात सुविधाची वानवा असल्याने प्रवाशांची हेळसांड होत आहे. सध्या पावसाचे पाणी थेट तात्पुरत्या प्रवासी निवाऱ्यात येत असल्याने चिखल साचला आहे. त्यामुळे काही प्रवासी नवीन बसस्थानकात थांबत असले तरी बस नेमकी कुठे लागणार याचा अंदाज येत नसल्याने धावपळ करावी लागत आहे.
फोटो :