कागदपत्रांअभावी अडले तुरीचे चुकारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:37 AM2018-03-08T00:37:25+5:302018-03-08T00:37:29+5:30
जिल्ह्यात पाचही ठिकाणी नाफेडने खरेदी केंद्र सुरु केले असून, तूर विक्री करण्यास पाहिजे तसा शेतकºयांचा प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे. मुख्य म्हणजे आता खरेदी केलेल्या तुरीचे जवळपास सव्वासहा कोटींचे चुकारेही कागदपत्राअभावी अडल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात पाचही ठिकाणी नाफेडने खरेदी केंद्र सुरु केले असून, तूर विक्री करण्यास पाहिजे तसा शेतकºयांचा प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे. मुख्य म्हणजे आता खरेदी केलेल्या तुरीचे जवळपास सव्वासहा कोटींचे चुकारेही कागदपत्राअभावी अडल्याचे समोर आले आहे.
नाफेड केंद्रावर तुरीची खरेदी कमी अन् गोंधळच जास्त होत असल्याने नोंदणी केलेले शेतकरीही शक्यतोर या ठिकाणी तूर खरेदीस घेऊन येत नाहीत. येथे तूर घेऊन आल्यानंतर होणाºया गोंधळाला कंटाळूनच अनेकांनी तर खाजगी बाजारात मिळेल त्या दरात तूर विकली. आजघडीला तूर खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकºयांची नोंदणी झालेली असली तरीही शेतकरी मात्र माल आणताना दिसत नाहीत. सद्यस्थितीत हिंगोली येथील खरेदी केंद्रावर १२३ शेतकºयांची १ हजार ४५६ क्विंटल, सेनगावच्या केंद्रावर २८८ शेतकºयांची ३१९८.५० क्विंटल आणि कळमनुरी येथील केंद्रावर ३६९ शेतकºयांची २९४० क्विंटल, वसमत येथील केंद्रावर २१७ शेतकºयांची १२७३.५० क्विं, आणि जवळा बाजार येथील खरेदी केंद्रावर ३३० शेतकºयांची २ हजार ९२१. ५० क्विंटल अशी एकूण १३२७ शेतकºयांची ११ हजार ७८९. ५० क्विंटल तुरीची खरेदी केल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनकडून मिळाली आहे. मात्र तूर खरेदी झाल्यानंतरही अनेक कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत. त्यामुळे शेतकºयांना तुरीचे चुकारे देण्यासाठी अडचणी येत आहेत. तूर खरेदी केलेल्या शेतकºयांचे कागदपत्र तपासणी सुरु असून, ते पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकºयांच्या खात्यावर चुकारे टाकण्यात येणार असल्याचे मार्केटींग अधिकारी शेवाळे यांनी सांगितले.
नाफेड केंद्रावर तूर विक्री केलेल्या शेतकºयांना कधीच चुकारे वेळेवर मिळत नसल्याची ओरड शेतकºयांतून होत आहे. येथे नेहमीच चुकाºयाची बोंबाबोंब होत असल्याचे शेतकरी म्हणत आहेत. येथील खेळीमेळी वातावरणामुळेच नाईलाजास्तव खाजगी बाजारात तूर विक्री करण्याची वेळ येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच येथे वारंवार होत असलेल्या चाळणीमुळे आणि जाचक अटीमुळे तूर विकणेही न परवडणारे झाले आहे.