पांदण रस्ते, वीजप्रश्न डीपीसीत गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:21 AM2021-07-10T04:21:28+5:302021-07-10T04:21:28+5:30

सौरपंपाच्या अर्जासाठी वेबसाईट चालत नाही. ज्यांना सौरपंप मंजूर झाला त्यांना जोडणी मिळत नाही, असा आरोप आ.मुटकुळे यांनी केला. तर ...

Paved roads, power issues erupted in DPC | पांदण रस्ते, वीजप्रश्न डीपीसीत गाजला

पांदण रस्ते, वीजप्रश्न डीपीसीत गाजला

Next

सौरपंपाच्या अर्जासाठी वेबसाईट चालत नाही. ज्यांना सौरपंप मंजूर झाला त्यांना जोडणी मिळत नाही, असा आरोप आ.मुटकुळे यांनी केला. तर दिलेले ७० टक्के साैरपंप बंद पडले. तेथे वीज जोडणीही मिळत नाही. या शेतकऱ्यांनी काय करायचे? असा सवाल डॉ.सतीश पाचपुते यांनी केला. तर चौकशी लावण्याची मागणी केली. ती मान्य करण्यात आली.

तीर्थक्षेत्राचे प्रस्ताव अजूनही सादर झाले नसल्याचा मुद्दा नवघरे यांनी मांडल्यानंतर खा.हेमंत पाटील यांनी संताप व्यक्त करीत जि.प. व पं.स.त अंतर किती आहे? यावर स्वतंत्र बैठक लावून प्रश्न निकाली काढण्यास सांगितले. रुग्णवाहिकांचा मदत व पुनर्वसनकडे पाठवायचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत पाठवा, असेही पाटील यांनी सुचविले. तर आरोग्यातील रिक्त पदे भरण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री गायकवाड यांनी दिले.

लसीकरणाचा वेग वाढण्यासाठी लस मिळणे गरजेचे असून ते केंद्राच्या हाती आहे. त्यामुळे केंद्राकडे राज्याने तसा प्रस्ताव पाठविल्याचेही बांगर यांच्या प्रश्नावर गायकवाड यांनी सांगितले. तर डायलिसिससाठी येथे एकावेळी आठ व दिवसभरात २४ जणांनाच लाभ देता येतो. यासाठी नियोजनमधून निधी देऊन किमान २५ जणांना एकावेळी लाभ देण्याची व्यवस्था करण्याची मागणीही बांगर यांनी केली. यावेळी जि.प.लघु सिंचनच्या कामांची तालुकानिहाय माहिती नसल्याने कार्यकारी अभियंता वाघमारे यांना मग बैठकीला आले कशासाठी? असा प्रश्न करून खा.पाटील यांनी फैलावर घेतले. तर गाभा क्षेत्रातील निधी इतरत्र का वळविला? असा सवालही केला. गाळे बांधकामाच्या नवघरे यांच्या प्रश्नावर चर्चा करून जि.प.कडून मंजुरी दिली जाईल, अशी माहिती जि.प.उपाध्यक्ष मनीष आखरे यांनी दिली. तर आ.बांगर यांनी डीपीसीतील कामे घेताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच झाली पाहिजे, असे म्हटले. त्यानंतर गतवर्षी पूर्ण १३५ कोटी रुपये खर्च करून जिल्हा अग्रेसर राहिल्याचे सांगण्यात आले. याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी कौतुक केल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली. तर यंदाचा १६० कोटींचा आराखडा असून ४०.३६ कोटी रुपयांची तरतूद प्राप्त झाली. त्यापैकी १२.५४ कोटीच वितरित झाले. यात काेविडवरच खर्च करण्याची मुभा असून ८.८८ कोटी खर्च झाल्याचे सांगण्यात आले.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर , शिवानंद मिनगीरे, विशाल राठोड यांच्यासह सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांची बैठकीस उपस्थिती होती.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयत्न करू

हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मंजूर झालेले आयुष महाविद्यालय सुरु करण्यासाठी जमीन उपलब्ध करुन दिली असून, तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या केंद्राच्या मंजुरीबाबत आपण सर्व लोकप्रतिनिधींनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करुन प्रयत्न करावेत, असे गायकवाड यांनी यावेळी सांगितले .

उपजिल्हा रुग्णालयाला सातवांचे नाव

बैठकीच्या प्रारंभी सर्व समिती सदस्यांकडून स्वर्गीय खा. राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच या बैठकीत उपजिल्हा रुग्णालय, कळमनुरी आणि हिंगोली येथील जिल्हा अपंग पुनवर्सन केंद्राला स्वर्गीय खा. राजीव सातव यांचे नाव देण्यासाठी ठराव पारित करण्यात आला.

शाळांना ७२ कोटी

जिल्ह्यातील शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या असून त्याचे नूतनीकरण करण्यासाठी मराठवाड्यासाठी ७२ कोटीचा निधी मिळणार आहे. ज्यात निविदा प्रक्रिया व कार्यारंभ आदेश झाले त्या शाळा पूर्ण कराव्यात व उर्वरित शाळा खोल्यांचे बांधकाम जि.प. शिक्षण समितीने बैठका घेऊन प्राधान्यक्रम ठरवून करावेत, अशा सूचना गायकवाड यांनी दिल्या.

पांदण रस्त्यासाठी स्वतंत्र बैठक

पांदण रस्त्याबाबत आ.बांगर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन तत्काळ मार्गी लावावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या. तसेच जिल्हा क्रीडा संकुलाचे दुरुस्तीचे काम तत्काळ पूर्ण करुन ते जनतेसाठी खुले करावे, अशा सूचनाही श्रीमती गायकवाड यांनी दिल्या.

Web Title: Paved roads, power issues erupted in DPC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.