पवार यांनी जपली सामाजिक बांधीलकी - आरोग्यमंत्री टोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:32 AM2021-09-21T04:32:26+5:302021-09-21T04:32:26+5:30
सुरुवातीला डॉ. यशवंत पवार यांनी प्रास्ताविक केले. यात रुग्णालयाच्या उभारणीचा संघर्ष व रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली, तर ...
सुरुवातीला डॉ. यशवंत पवार यांनी प्रास्ताविक केले. यात रुग्णालयाच्या उभारणीचा संघर्ष व रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली, तर पत्नी डॉ. स्वाती पवार यांच्या पॅथॉलॉजी लॅबमध्येही नव्याने अनेक चाचण्यांची व्यवस्था केल्याचे सांगितले, तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब, शहीद जवानांचे कुटुंब, स्वातंत्र्यसैनिक यांना मोफत सेवा आधीच देण्यात येत होती. आता कोरोनात दगावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या मोफत सेवा देण्याचा निश्चयही त्यांनी व्यक्त केला.
पुढे मंत्री टोपे म्हणाले, डॉ. यशवंत पवार यांनी आपल्या हॉस्पिटलचे नाव सह्याद्री ठेवण्यामागे शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ओढ असल्याचे सांगितले. त्यामुळे शिवरायांच्या इतिहासात रमणारा हा डॉक्टर रुग्णांना सेवा देतानाही सामाजिक बांधीलकी जपणारच. तसा त्यांच्या कुटुंबांचाही सामाजिक वारसा त्यांना लाभला आहे. या रुग्णालयाची उभारणी त्यांनी संघर्षातून, मेहनतीने व सामाजिक भान ठेवत केलेल्या रुग्णसेवेतून केली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा मोठा चमू त्यांच्याकडे आहे. अचूक निदान व तंत्रज्ञानाचा योग्य वापर या समन्वयातून त्यांना रुग्णसेवा घडावी, ही प्रार्थना, तसेच त्यांना गोरगरिबांना दीड लाखांपर्यंतची मोफत सेवा देता यावी, यासाठी म. फुले जन आरोग्य अभियानात हे रुग्णालय घेतले जाईल. त्यासाठीचे निकष पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.