पिकविम्याचे पैसे तातडीने द्या; सेनगावात शेतकऱ्यांनी केले जलसमाधी आंदोलन

By यशवंत भीमराव परांडकर | Published: January 19, 2023 02:14 PM2023-01-19T14:14:47+5:302023-01-19T14:16:07+5:30

लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतले.

Pay crop insurance ; Jalsamadhi movement was held by farmers in Sengaon | पिकविम्याचे पैसे तातडीने द्या; सेनगावात शेतकऱ्यांनी केले जलसमाधी आंदोलन

पिकविम्याचे पैसे तातडीने द्या; सेनगावात शेतकऱ्यांनी केले जलसमाधी आंदोलन

googlenewsNext

कडोळी (जि. हिंगोली) : पिकविम्याचे पैसे तातडीने देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी सेनगाव तालुक्यातील भगवती व आजूबाजूच्या गावांतील शेतकऱ्यांनी पैनगंगा नदीमध्ये १९ जानेवारी रोजी जलसमाधी आंदोलन केले.

यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी पिकविमा काढला आहे. परंतु, पिकविम्याचे पैसे अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पडले नाही. यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी कार्यालयावर २३ डिसेंबर २०२२ रोजी मोर्चा काढला होता. यावेळी अधिकाऱ्यांनी पिकविमा परताव्याची रक्कम देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे १९ जानेवारीपासून भगवती जवळील पैनगंगा नदीमध्ये शेतकऱ्यांनी उतरुन जलसमाधी आंदोलन केले. 
या आंदोलनात भगवतीसह माझोड, गुगूळ पिंपरी, तपोवन, गारखेडा, कडोळी, गोरेगाव आदी दहा ते पंधरा गावांतील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  

दरम्यान, तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत कृषी व महसूल कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना त्यांनी पिकविमा रकमेच्या संदर्भात पुढील कार्यवाही शासनस्तरावर केली जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात सरपंच वासुदेव जाधव, अर्जुन नाईक, बालाजी कोळसकर, नामदेव पतंगे, अमोल कोळसकर, बबन जाधव, साहेबराव जाधव, बबन कांबळे, शेख आयुब, सुरेश जाधव, शेख सोनू, शेख निजाम, भाऊराव कांबळे, रामजी जाधव, प्रल्हाद जाधव आदी दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

Web Title: Pay crop insurance ; Jalsamadhi movement was held by farmers in Sengaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.