कळमनुरी तालुक्यात शांततेत मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:34 AM2021-01-16T04:34:31+5:302021-01-16T04:34:31+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी काही मतदान केंद्रांवर सामाजिक अंतराचे पालन करण्यात आले. तर काही मतदान केंद्रांवर सामाजिक आंतराचे ...
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी काही मतदान केंद्रांवर सामाजिक अंतराचे पालन करण्यात आले. तर काही मतदान केंद्रांवर सामाजिक आंतराचे पालन झाले नसल्याचे दिसून आले. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी तोंडाला मास्क लावलेले होते. सकाळच्या सत्रात बऱ्यापैकी मतदान झाले. काही मतदान केंद्रांवर सकाळपासूनच रांगा लागलेल्या होत्या. तालुक्यात शांततेत व भयमुक्त वातावरणात ग्रामपंचायत निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला होता. दर दोन तासाला मतदानाची टक्केवारी १८ टेबलद्वारे काढण्यात येत होती. तालुक्यातील ९० मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाल्याची माहिती तहसीलदार दत्तू शेवाळे, नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांनी दिली. या मतदान केंद्रांवर ६२,१७७ पुरुष, ५६,६८१ महिला असे एकूण १,१८,८५८ मतदार आहेत.