पीकविमा पोर्टलच अंडर मेंटनन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:25 AM2018-07-21T00:25:23+5:302018-07-21T00:25:58+5:30

प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१८-१९ साठी खरिपातील अधिसुचित पिकासाठी आॅनलाईन पद्धतीने विमा उतरविण्यासाठी शेतकरी दिवसरात्र सेतू सुविधा केंद्रात ठाण मांडून आहेत. मात्र आॅनलाईन पोर्टलच अंडर मेन्टेनन्स असल्याने अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत.

 Peakvima Portlet Under Maintenance | पीकविमा पोर्टलच अंडर मेंटनन्स

पीकविमा पोर्टलच अंडर मेंटनन्स

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
केंद्रा बु. : प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१८-१९ साठी खरिपातील अधिसुचित पिकासाठी आॅनलाईन पद्धतीने विमा उतरविण्यासाठी शेतकरी दिवसरात्र सेतू सुविधा केंद्रात ठाण मांडून आहेत. मात्र आॅनलाईन पोर्टलच अंडर मेन्टेनन्स असल्याने अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत.
पीकविमा भरण्यास बिगर कर्जदारासाठी २४ जुलै तर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३१ जुलै अंतिम मुदत आहे. पीक विमा या पोर्टलच्या तांत्रिक कारणामुळे मुदतीपूर्व अर्ज भरण्यासाठी शेतकरी वंचित राहू शकतात. यामुळे शासनाने आॅफलाईन पद्धतीने बँकमार्फत विमा घेण्याची व सेतू सुविधा पार्टल व्यवस्थित करून जुलैची मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
खरीप हंगामात पेरणी केलेल्या सर्वच पिकांच्या संरक्षणार्थ पंतप्रधान पीक विमा योजना शासन राबवित आहे. कर्जदार शेतकºयांना त्या बँक शाखेमार्फतच विमा उतरविला जाणार आहे. मात्र बँकेच्या पोर्टलचीसुद्धा हीच अवस्था आहे. पोर्टलवर विमा भरताना सेतूसुविधा केंद्राचे संचालक एका शेतकºयांसाठी तासन्तास बसत आहेत. याबाबत तक्रार तरी करायची कुठे? हा प्रश्न आहे.
पार्टलच्या अनेक तांत्रीक अडचणी येत आहेत. कधी पिकविमा हप्त्याची रक्कम कपात होते. मात्र पावती निघत नाही. बरेच वेळा आधार कार्डवरून ओळख पटविण्यासाठी पोर्टलवेळ घेत आहे. आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक रात्रंदिवस संगणकासमोर बसले आहेत. पोर्टलच्या बिघाडीचा शेतकºयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. संचालक व शेतकरी यांचा विचार करून प्रशासनाने आॅनलाईन ऐवजी आॅफलाईन पद्धतीने विमा हप्ता स्वीकार करून जुलैची तारीख वाढवून देण्याची मागणी होत आहे.

 

Web Title:  Peakvima Portlet Under Maintenance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.