कर्जमाफीचे १६२१७ अर्ज प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:21 AM2018-05-18T00:21:36+5:302018-05-18T00:21:36+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील १६१.८४ कोटींची कर्जमाफी झाली तरीही १६ हजार २१७ अर्ज अजूनही प्रलंबितच आहेत. आतापर्यंत ३५ हजार १८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३.२८ कोटी वर्ग झाल्याचे सांगितले जात असले तरीही प्रत्यक्ष लाभार्थ्यांना बँकांकडून त्याची माहितीच मिळत नाही.

 Pending lapse of 16217 applications | कर्जमाफीचे १६२१७ अर्ज प्रलंबित

कर्जमाफीचे १६२१७ अर्ज प्रलंबित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील १६१.८४ कोटींची कर्जमाफी झाली तरीही १६ हजार २१७ अर्ज अजूनही प्रलंबितच आहेत. आतापर्यंत ३५ हजार १८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३.२८ कोटी वर्ग झाल्याचे सांगितले जात असले तरीही प्रत्यक्ष लाभार्थ्यांना बँकांकडून त्याची माहितीच मिळत नाही.
२0१७ मध्ये कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनीच ११३ कोटी रुपयांचा निधी मिळाला व तो खात्यावर वर्ग होणार असल्याचे सांगण्यात येत होते. तो निधी पूर्णपणे लाभार्थी शेतकºयांच्या खात्यावर वर्ग झाल्याचे मे २0१८ मध्ये सांगितले जात आहे. मात्र या लाभार्थ्यांनाही खरेच त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली व खाते बेबाकी झाले की नाही, याची माहिती मिळत नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी अजूनही कर्जमाफीच्या नावाने बोंब ठोकत आहेत. ज्यांना माफी मिळाली नाही, त्यांची बोंब रास्त आहे. मात्र त्यांच्यासोबतच ज्यांना माफी मिळाली त्यांचेही यादीत नाव असताना बँकेत थकबाकी दिसत असल्याने त्यांचा तर दुप्पट आवेश आहे.
ही योजनाच फसवी असल्याचे ही मंडळी सांगत सुटली आहेत. वारंवार योजनेत होणारा बदल, यासंदर्भात आलेले शेकडो निर्णय या योजनेला मारक ठरत आहेत.
त्यामुळे खरेच याचा लाभ मिळाला की नाही, हेही कळायला मार्ग नाही. एकूण ४३५१२ खातेदारांना १६१.८४ कोटींची कर्जमाफी झाली. जि.म.स.च्या १७८२ खातेदारांचे २१.४९ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांचे १११२७ खातेदारांचे ५९.९८ कोटी तर ग्रामीण बँकेच्या ६२३३ खातेदवारांचे ३१.८0 कोटी रुपये खात्यावर वर्ग झाल्याचे सांगितले जात आहे. तर जि.म.स.च्या ३२१८ जणांचे ४.९७ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांचे २९७१ जणांचे २८.११ कोेटी तर ग्रामीण बँकेच्या २१४१ जणांचे १५.४७ कोटी अजूनही शिल्लक आहेत.
आता नव्याने या योजनेची व्याप्ती वाढली आहे. तर २00१ पासूनच्या थकबाकीदारांनाही यात लाभ मिळणार आहे. याची माहिती संकलित करण्याचे काम नव्याने सुरू झाले आहे. त्यामुळे कर्जमाफीचे काम करतानाच या सरकारचा कार्यकाळ संपतो की काय, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. प्रशासनही या सर्व प्रकारामुळे बुचकळ्यात पडत आहे. बँकांनाही अशी माहिती देताना नाकीनऊ येत असल्याचे चित्र आहे.
पुरावाच नाही
काही शेतकºयांना अज्ञानामुळे आपला अर्ज मंजूर झाला की नाही, हे कळायला तयार नाही. तर काहींचा अर्ज मंजूर झाल्यानंतरही कर्जमाफी झाल्याचा काही पुरावा आहे काय? असा उलट सवाल बँकेत ऐकावा लागत आहे. बँकेने संबंधितांना सांगण्याऐवजी त्यांच्याकडूनच ऐकावे लागत आहे.
शेतकºयाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जात आहे. तर काही शेतकरी मात्र वाद घालून माहिती मिळवून निश्चिंत झाले आहेत.
जिल्ह्यातील एकूण ९८ बँक शाखांमधून कर्जमाफीसाठी नव्याने १८४६९ अर्ज प्राप्त झाले आहेत. यात हिंगोली ८0८२, वसमत २९0२, औंढा ना-१0८४, कळमनुरी ३२३२ तर सेनगावातून ३१६९ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. ते तालुका स्तरीय छाननी समितीकडे वर्ग करण्यात आले होते. या समितीने या अर्जांची
पडताळणी केली असून यापैकी १६२१७ अर्ज कर्जमाफीच्या पोर्टलवर अपलोड केले आहेत. यात हिंगोली ६९0२, वसमत २0९0, औंढा ना-९९७, कळमनुरी २८३९ तर सेनगावातून ३३८९ अशी तालुकानिहाय अर्जांची संख्या आहे.
तालुकास्तरीय समितीच्या अधिकाºयांना आपली कामे सांभाळून हे काम करावे लागत आहे. वारंवार मिळणाºया मुदतवाढीत अर्ज येतच आहेत. त्यामुळे २२0४ अर्ज अजूनही पोर्टलवर अपलोड करणे बाकीच आहे.

Web Title:  Pending lapse of 16217 applications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.