जिल्ह्यातील २८ शाळा सुरू करण्यास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:21 AM2021-07-20T04:21:15+5:302021-07-20T04:21:15+5:30

हिंगोली जिल्ह्यात शाळा सुरू करण्यासाठी ज्या समित्यांवर जबाबदारी सोपविली, त्यांची बैठकच होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी कार्यालयास ...

Permission to start 28 schools in the district | जिल्ह्यातील २८ शाळा सुरू करण्यास परवानगी

जिल्ह्यातील २८ शाळा सुरू करण्यास परवानगी

Next

हिंगोली जिल्ह्यात शाळा सुरू करण्यासाठी ज्या समित्यांवर जबाबदारी सोपविली, त्यांची बैठकच होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी कार्यालयास ठराव प्राप्त होत नाहीत. परिणामी, या शाळा सुरू करण्यात अडचणी येत आहेत. माध्यमिक विभागाकडे सर्व प्रक्रिया करून आठ शाळा सुरू करण्याचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये कळमनुरी तालुक्यात छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दांडेगाव, वसमत तालुक्यात निवासी हायस्कूल बाराशिव, दणकेश्वर विद्यालय आडगाव रंजे, श्री रोकडेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पांगरा शिंदे, औंढा ना. श्री शांती विद्या मंदिर शिरड शहापूर, सेनगाव तालुक्यात विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय कोळसा, हिंगोली तालुक्यात ए.बी.एम. इंग्लिश हायस्कूल एमआयडीसी लिंबाळा, सुखदेवानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भांडेगाव या शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

जवळपास साडेतीनशे शाळांपैकी फक्त आठच शाळा सुरू झाल्या आहेत. अजून मोठ्या संख्येने शाळांना परवानगी मिळणे बाकी आहे.

प्राथमिकच्या १८ शाळांचे प्रस्ताव

प्राथमिक विभागाकडे २० शाळा सुरू करण्याचे प्रस्ताव आले आहेत. या शाळा उद्यापासून सुरू होतील, त्यांना आज परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी दिली.

Web Title: Permission to start 28 schools in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.