अतिविश्वास ठेवणे अंगलट आले; पेट्रोल पंपाच्या मॅनेजर आणि कर्मचाऱ्याने ११ लाखांना फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 12:50 PM2021-08-31T12:50:01+5:302021-08-31T12:51:30+5:30

Crime in Hingoli : पंपावरील रीडिंग घेणे आणि रोख रक्कम बँकेत जमा करणे अशी महत्वाची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांनी दिला धोका

A petrol pump manager and employee defrauded Rs 11 lakh in Vasmat | अतिविश्वास ठेवणे अंगलट आले; पेट्रोल पंपाच्या मॅनेजर आणि कर्मचाऱ्याने ११ लाखांना फसवले

अतिविश्वास ठेवणे अंगलट आले; पेट्रोल पंपाच्या मॅनेजर आणि कर्मचाऱ्याने ११ लाखांना फसवले

googlenewsNext

वसमत ( हिंगोली ) : येथील देशपांडे पेट्रोल पंपाच्या मालकाला कर्मचाऱ्यांवर अति विश्वास ठेवणे अंगलट आले आहे. पंपावरील मॅनेजर व एका कर्मचाऱ्याने मिळून तब्बल ११ लाख ३९ हजार २४० रुपयांची रक्कम हडप केल्याचे मालकाच्या निदर्शनास आले आहे. सतीश मधुकर डिंडूरकर तर गणेश उदावंत अशी अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात चोरी व विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. ( A petrol pump manager and employee defrauded Rs 11 lakh in Vasmat) 

याबाबत अधिक माहिती अशी की, आदित्य श्रीकांत देशपांडे यांचा वसमत शहरात देशपांडे पेट्रोल पंप आहे. येथे सतीश मधुकर डिंडूरकर मॅनेजर तर गणेश उदावंत कर्मचारी म्हणून काम करत. या दोघांवर देशपांडे यांचा विश्वास असल्याने पंपावरील रीडिंग घेणे आणि रोख रक्कम बँकेत जमा करणे अशी महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र, मागील काही दिवसांपासून पेट्रोल पंपाच्या हिशोबात फार मोठी तफावत देशपांडे यांना आढळून आली. अपहर होत असल्याचा संशय वाढत गेल्याने देशपांडे यांनी  चौकशी सुरु केली. यातून बँकेत भरणा व डिझेलपेट्रोल विक्रीची रीडिंग याच्या नोंदीत तफावत आढळून आली. अधिक तपास केला असता २ जुलै ते ६ जुलै या कालावधीतील हिशोबात घोटाळा समोर आला.

मॅनेजर सतीश मधुकर डिंडूरकर आणि कर्मचारी गणेश उदावंत यांनी या कालावधीत तब्बल ११ लाख ३९ हजार २४० रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पेट्रोल पंप मालक आदित्य देशपांडे यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून सतीश मधुकर डिंडूरकर व गणेश उदावंत ( दोघे राहणार वसमत ) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक हेंद्रे करत आहेत.

Web Title: A petrol pump manager and employee defrauded Rs 11 lakh in Vasmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.