पेट्राेल २७ तर डिझेल २८ पैशांनी महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:39 AM2021-01-08T05:39:10+5:302021-01-08T05:39:10+5:30
हिंगोली : मागील काही दिवसांपासून पेट्राेल व डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे महागाई वाढत असून यात सामान्यांचे कंबरडे मोडत आहे. १ ...
हिंगोली : मागील काही दिवसांपासून पेट्राेल व डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे महागाई वाढत असून यात सामान्यांचे कंबरडे मोडत आहे. १ डिसेंबरपासून आजपर्यंत पेट्राेल २७ तर डिझेल २८ पैशांनी महागल्याचे दिसून येत आहे. आणखी दरवाढीची चर्चा होत आहे.
हिंगोली जिल्ह्यातच नव्हे, तर देशात पेट्राेल व डिझेल दरवाढीच्या फटक्याने सामान्य जनता हैराण आहे. मात्र ही वाढ कायमच आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या वा घटल्या तरीही या दरात मात्र फरक येत नसल्याने ओरड कायम आहे. यासाठी अनेकदा विरोधी पक्षांकडून आंदोलनेही होत आहेत. मात्र ही दरवाढ कायम आहे. आता पुन्हा दरवाढ होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्यामुळे हा विषय पुन्हा एकदा तापला आहे. मागील एक महिन्यातच दिवसाला एक पैसा वाढल्याचे चित्र आहे. त्यात १ डिसेंबर रोजी पेट्राेलचा दर ९१.५८ रुपये होता. आता तो ९१.८५ रुपये आहे. त्यात २७ पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलचा दर ८०.५३ रुपये होता आता तो ८०.८१ रुपयांवर गेला आहे. आधीच महागाईने भरडत चाललेल्या जनतेला आता पुन्हा दरवाढ झाली तर ती सहन होणे शक्य नसल्याचे दिसत आहे.