हिंदु-मुस्लिमांनी घडवले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2017 03:13 PM2017-02-25T15:13:57+5:302017-02-25T15:35:48+5:30
ऑनलाइन लोकमत शिरपूर, दि. 25 - येथील जानगीर महाराज यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित महाप्रसाद बनविल्यानंतर तो हजरत मिर्झा बांबांना नैवद्य ...
ऑनलाइन लोकमत
शिरपूर, दि. 25 - येथील जानगीर महाराज यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित महाप्रसाद बनविल्यानंतर तो हजरत मिर्झा बांबांना नैवद्य दाखविल्यानंतर वाटप करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. ती आजही कायम असून २५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता हजरत मिर्झा बाबांच्या समाधीस्थळी नैवद्य दाखविल्यानंतर महाप्रसादास सुरुवात करण्यात आली.
जानगीर महाराज संस्थानवर महाशिवरात्रीच्या दुस-या दिवश भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी १५१ क्विंटल गव्हाच्या पोळया व १०१ क्विंटलची भाजी बनविण्यात आली आहे. यावेळी तयार झालेल्या महाप्रसादाचा नैवद्य वाजत गाजत हजरत मिर्झा बाबांच्या समाधीस्थळी नेण्यात आला. यावेळी मुस्लिम भाविकांनी या सोहळयात सहभागी भाविकांचा सत्कार करुन राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले.
https://www.dailymotion.com/video/x844sm2