कुंभार समाजातर्फे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:58 PM2017-12-15T23:58:44+5:302017-12-15T23:58:58+5:30

विविध मागण्यांसाठी कुंभार समाजाच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

Pillar movement by the Kumbhar community | कुंभार समाजातर्फे धरणे आंदोलन

कुंभार समाजातर्फे धरणे आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : विविध मागण्यांसाठी कुंभार समाजाच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजपच्या नेत्यांनीही वर्धा येथील मेळाव्यात या समाजाच्या विविध मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तीन वर्षांचा कालावधी लोटला तरीही त्याची पूर्तता होत नसल्याची तक्रार जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. या समाजाची आर्थिक प्रगती साधण्यासाठी मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानप्रमाणे स्वतंत्र माती कला महामंडळ स्थापन करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर उदरनिर्वाहासाठी भटकंतीचे जीवन जगणाºया कुंभार समाजाचा भटक्या विमुक्त जमाती या प्रवर्गात समावेश करावा, कुंभार समाजास वीट, मडकी व मूर्ती व्यवसायासाठी अस्तित्वात असलेल्या कुंभार खाणी त्वरित बहाल कराव्यात, कुंभार समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधीत्व द्यावे, संत शिरामेणी गोरोबा काका यांचे जन्मगाव तेर (जि.उस्मानाबाद) येथे तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन विकास करावा, जिल्हा स्तरावर संत गोरोबा शासकीय वसतिगृह सुरू करावे, कुंभार व्यवसायासाठी एमआयडीसीत भूखंड द्यावा आदी मागण्या केल्या आहेत. निवेदनावर विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर रांजणे, जिल्हाध्यक्ष बबन लोणारे, भास्कर सांबरकर, अशोक बमरुल्लले, इंदूताई कुंटूरकर, अशोक भुसांडे, देवेश भुसांडे, बालासाहेब पोटेकर आदींच्या सह्या आहेत.
रॉयल्टीचा प्रश्न
४कुंभार समाजास ५00 ब्रासपर्यंत माती नेण्यास शासनानेच मुभा दिली. मात्र त्याचा परवाना तहसीलकडून दिला जात नाही. दिला तरीही रॉयल्टीसाठी वाहने अडविली जात आहेत. शिवाय कुंभार समाजाच्या वीटभट्टी चालकांना अकृषिकसाठी त्रस्त केले जात असल्याच्याही संबंधितांच्या तक्रारी आहेत.

Web Title: Pillar movement by the Kumbhar community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.