औंढा नागनाथ येथील खड्डा बनला धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:24 AM2021-01-09T04:24:49+5:302021-01-09T04:24:49+5:30
औंढा नागनाथ : हिंगोली- औंढा महामार्गावर काम सुरू आहे. यादरम्यान असलेल्या नवीन बस स्थानकासमोरील रस्त्यावर जागाेजागी खड्डे पडले आहेत. ...
औंढा नागनाथ : हिंगोली- औंढा महामार्गावर काम सुरू आहे. यादरम्यान असलेल्या नवीन बस स्थानकासमोरील रस्त्यावर जागाेजागी खड्डे पडले आहेत. तसेच माेठा खड्डा पडल्याने वाहतुकीसाठी धाेकादायक बनला आहे.
या रस्त्यावर नळयोजनेमुळे जागोजागी चिखल झाला आहे. त्यामुळे ये- जा करणाऱ्या वाहनांना चिखल व खड्ड्यांचा मोठा त्रास होत आहे. शाम कन्स्ट्रक्शनने याबाबत नगर पंचायतीला सूचना देऊनही अद्याप याची दखल घेतली नाही. आठ दिवसांपासून हा खड्डा रस्त्याच्या मधोमध खोदून ठेवल्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप होत आहे. ज्योतिर्लिंग असल्याने याठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, असे असतानाही रस्त्यातील खड्डे धोकादायक ठरत आहेत. बुधवारी रात्री नवविवाहित जोडपे या खड्ड्यांमध्ये पडून जखमी झाल्याची घटना घडली आहे. एवढे होऊनही स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत, हे मात्र विशेष.
फाेटाे नं २०