रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:18 AM2021-01-13T05:18:02+5:302021-01-13T05:18:02+5:30
बस सुरू करण्याची मागणी पांगरा शिंदे : वसमत तालुक्यातील पाेतरा, बोल्डा व पांगरा शिंदेसह परिसरात धावणारी कळमनुरी आगारातील बसही ...
बस सुरू करण्याची मागणी
पांगरा शिंदे : वसमत तालुक्यातील पाेतरा, बोल्डा व पांगरा शिंदेसह परिसरात धावणारी कळमनुरी आगारातील बसही कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे बंद करण्यात आली. सुमारे २० वर्षांपासून गावात धावणारी बससेवा बंद झाल्याने गाव व परिसरातील सर्व प्रवासी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. अनेकांना खासगी वाहनांतून महागडा प्रवास करावा लागत आहे. यासाठी ही बससेवा त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी परिसरातील गावकरी करीत आहेत.
रस्त्यावर केरकचरा, घाणीचे साम्राज्य
हयातनगर : वसमत तालुक्यातील हयातनगर गावातून जवळाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक नागरिक कचरा टाकत असल्याने याठिकाणी उकीरडा निर्माण होत आहे. अनेकदा संबंधीत विभागाकडून साफसफाई करण्यात आल्यानंतरही नागरिक या रस्त्यावरच कचरा टाकीत आहेत. यासाठी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन याठिकाणचा कचरा कमी करण्यासाठी उपाय योजनाची गरज असल्याचे जाणवत आहे.
वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला
नंदगाव : औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव, अंजनवाडा, सिद्धेश्वर, सावंगी यासह इतर गावातील शेतशिवारात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. या भागातील बऱ्याच पिकांमध्ये वन्यप्राणी घुसून पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. यासाठी वन विभागाने याकडे लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करीत आहेत.
पीकविमा देण्याची मागणी
आंबाचोंढी : वसमत तालुक्यातील आंबाचोंढी व परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरविला आहे. अतिवृष्टीमुळे हे सर्व पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले. ऑनलाईन पीकविमा उतरुनही अजून या शेतकऱ्यांना पीकविमा मिळत नाही. त्यामुळे अतिवृष्टीने झोडपलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली
वसमत : महिन्यातला दुसरा शनिवार व रविवार असल्यामुळे सलग दोन दिवस सुट्ट्या येत असल्याने अनेकांचे गावाकडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. सलग दोन दिवस सुट्टी असल्याने शासकीय कर्मचारीही बसस्थानकात गावाकडे जाण्यासाठी गर्दी करीत आहेत. प्रवाशांच्या गर्दीमुळे आगाराच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसत आहे.