गिट्टी टाकून खड्डे बुजले; धोका मात्र दुप्पट वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:32 AM2021-08-27T04:32:32+5:302021-08-27T04:32:32+5:30
अकोला ते नांदेड जाणारी वाहने हिंगोली शहराच्या बाहेरून काढून देण्यासाठी बायपास तयार करण्यात आला आहे. शहरातील रेल्वे उड्डाणपुलाचे काम ...
अकोला ते नांदेड जाणारी वाहने हिंगोली शहराच्या बाहेरून काढून देण्यासाठी बायपास तयार करण्यात आला आहे. शहरातील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने बहुतांश जड वाहनांसह इतरही वाहने बायपासमार्गेच धावत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. मात्र या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत असून अनेकवेळा अपघाताला सामोरे जावे लागत आहे. पावसात तर खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अनेक दुचाकी चालक घसरून पडले आहेत. वाहनचालकांतून ओरड होत असल्याने बांधकाम विभागाने तात्पुरता उपाय म्हणून खड्ड्यात मातीमिश्रीत गिट्टी टाकली जात आहे. यावर रोलर फिरविले नसल्याने वाहनामुळे ही गिट्टी वर येत आहे. तसेच प्रचंड धूळ उडत आहे. दुचाकीचालक तर गिट्टीवरून घसरून पडल्याचा आरोपही होत आहे. तात्पुरते बुजलेले खड्डे पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक ठरत आहेत. डोळ्याचे आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खड्डे डांबराने बुजावेत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
फोटो :