प्लास्टिक विक्रेत्यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 11:36 PM2019-09-19T23:36:04+5:302019-09-19T23:36:57+5:30

शासनाने प्लास्टिकचे उत्पादन, वापर, विक्री व वाहतुकीला बंदी घातली असतानाही त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध नगरपालिकेने कारवाई करून ९ हजारांचा दंड लावून प्लास्टिक जप्त केले आहे.

 Plastic sellers fine | प्लास्टिक विक्रेत्यांना दंड

प्लास्टिक विक्रेत्यांना दंड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शासनाने प्लास्टिकचे उत्पादन, वापर, विक्री व वाहतुकीला बंदी घातली असतानाही त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध नगरपालिकेने कारवाई करून ९ हजारांचा दंड लावून प्लास्टिक जप्त केले आहे.
महाराष्ट्र शासन द्वारे प्लास्टिक व थर्मोकॉल अविघटनशील वस्तूंचे उत्पादन,वापर विक्री व वाहतुक प्लास्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तूचे उत्पादन, वापर,विक्री, वाहतुक, हाताळणी, साठवणूक) अधिसूचना २०१८ दि. २३ मार्च,२०१८ पासुन प्लास्टिक, थर्माकोलच्या एकदाच वापरात येणाºया वस्तूवर संपूर्णत: बंदी घातलेली आहे. हे बंधन न पाळल्यास कारवाईचा इशारा वारंवार दिला जात आहे. त्यामुळे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांचे मार्गदर्शनाखाली हिंगोली नगर परिषदेच्या पथकाद्वारे १९ रोजी बाजारपेठेमध्ये प्लास्टिकजप्ती व दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण ९ हजारांचा दंड वसूल केला आहे. तर ४0 कि.ग्रॅ. प्लास्टिक, थर्माकोल, पॉलिप्रॉपोलीन जप्त केले आहे.याप्रमाणे नियमित स्वरूपास नगर परिषद कार्यलयामार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे.
सदर कार्यवाहीमध्ये उमेश हेंबाडे, उपमुख्याधिकारी, शाम माळवटकर, प्रशासकीय अधिकारी, सनोबर तसनीम, नोडल अधिकारी, बाळू बांगर, स्वच्छता निरीक्षक, आशिष रणसिंगे, शहर समन्वयक दत्तराव शिंदे, पंडित मस्के, गजानन आठवले, गजानन बांगर, विजय इंगोले, प्रवीण चव्हाण, संदीप गायकवाड, दिनेश वर्मा, अमर ठाकूर, अफसरखान पठाण, राजेश आठवले आदी सहभागी होते. गेल्या अनेक दिवसांपासून मोहीम थंडावल्याने शहरात प्लास्टिकचा मुक्तवापर सुरू होता.

 

Web Title:  Plastic sellers fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.