पोलीस प्रशासनास धनादेश प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:11 AM2018-10-23T00:11:18+5:302018-10-23T00:11:44+5:30

श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरच्या वार्षिकोत्सवामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकारीवर्गही मोठ्या प्रमाणावर होता.

 Police administration provided checks | पोलीस प्रशासनास धनादेश प्रदान

पोलीस प्रशासनास धनादेश प्रदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरच्या वार्षिकोत्सवामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकारीवर्गही मोठ्या प्रमाणावर होता.
गृह विभागाकडून सहकार्य मिळते. सर्व कर्मचारी, अधिकारी पूर्ण वेळ देऊन चोख बंदोबस्त करून कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने चांगले काम केले. त्यांच्या कर्तव्याबद्दल संस्थानच्या वतीने मदत म्हणून निधी देण्याचे ठरले होते. त्यानुसार संस्थानकडून ५१ हजार रुपयाचा धनादेश योगेश कुमार यांना देवून शाल, हार व श्रीफळाने सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल, मुरलीधर मुंदडा, रमाकांत मिस्किन, सुरेश घन, अनिल बीडकर, सचिन घन, मनोज दावनगिरे, बालाजी कामटलवार, प्रेमचंद जैस्वाल व सचिव दिलीप बांगर उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title:  Police administration provided checks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.