अवैध देशी दारू विक्री रोखण्यास पोलीस सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:08 AM2017-11-30T00:08:09+5:302017-11-30T00:08:13+5:30

येथील इंदिरा गांधी चौकानजीक मच्छी मार्केटमधील देशी दारुचे दुकान भल्या पहाटेच उघडत असल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त होताच सकाळी आठ वाजता छापा मारला. दहा ते बारा जण दुकानात आढळून आले. पोलिसांनी त्यांचे जबाब घेतले असून या छाप्यामुळे खळबळ उडाली आहे.

Police are ready to stop illegal country liquor sales | अवैध देशी दारू विक्री रोखण्यास पोलीस सज्ज

अवैध देशी दारू विक्री रोखण्यास पोलीस सज्ज

googlenewsNext
ठळक मुद्देहिंगोलीत कारवाई : पहाटेच उघडले दुकान

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील इंदिरा गांधी चौकानजीक मच्छी मार्केटमधील देशी दारुचे दुकान भल्या पहाटेच उघडत असल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त होताच सकाळी आठ वाजता छापा मारला. दहा ते बारा जण दुकानात आढळून आले. पोलिसांनी त्यांचे जबाब घेतले असून या छाप्यामुळे खळबळ उडाली आहे.
देशी दारूची दुकाने उघडण्यासाठी असलेले नियम अनेकदा पायदळी तुडविले जातात. विशेषत: दारू विक्री बंदच्या दिवशी तर मागचा दरवाजा खुलाच असतो. विशेष म्हणजे काही दुकानदार तर आधीच ठरावीक संख्येत बॉक्स बाहेर काढून ठेवतात. त्यामुळे बंदबारीत तर तळीरामांची अधिक चांगली सोय होते. त्याला जागेवर पोच पार्सलची व्यवस्थाही काहीजण करतात. परंतु मनुष्यबळ उपलब्ध नाही अन् मागील काही दिवसांपासून देशी दारूची विक्री घटत असल्याचे सांगून राज्य उत्पादन शुल्क विभाग कोणतीच कारवाई करीत नाही. यावर पोलीस कारवाई झालीच तर त्यात केवळ कारवाईची शिफारसच करता येते. तर राज्य उत्पादन शुल्ककडून अभय मिळत असल्याने दुकानदार निश्चिंत आहेत. आमदारांनी केलेल्या उपोषणाच्या वेळी तर कारवाई प्रस्तावित केलेल्या दुकानांची यादीच दिली होती. यात पुसेगावच्या मालाबाई सीताराम जैस्वाल, वसमतचे दीपक अमृतलाल जैस्वाल व बालाजी रुखमाजी चेपूरवार, औंढा येथील चंद्रकुमार जैस्वाल, जवळा बाजार येथील लक्ष्मण लोधी, हिंगोलीतील शैलेश जैस्वाल, बी.डी.बगडिया, कमलेश जैस्वाल, कळमनुरीचे नितीन जैस्वाल, सिरसम येथील देवेंद्र बन्सीलाल जैस्वाल, हट्ट्याचे चंदू चेपूररवार, शेख सदलजी शेख मदार, जवळा बाजारचे ओ.ए.परिहार अ‍ॅण्ड पार्टनर, पांगरा शिंदेचे हीरालाल बाबूलाल जैस्वाल यांच्या दुकानांबाबत ही शिफारस केली आहे. यातील काही नावेच चुकीची असल्याबाबत विचारले असता ती राज्य उत्पादन शुल्कने तपासून कारवाई केली पाहिजे, असे सांगण्यात आले.
आज सकाळी हिंगोलीत मच्छी मार्केटमधील दुकान वेळेपूर्वीच सुरू झाल्यानंतर केलेल्या कारवाईने पोलीस यंत्रणा आता खºया अर्थाने सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: Police are ready to stop illegal country liquor sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.