हिंगोलीत कत्तलखान्याकडे जनावरे नेणारा ट्रक पोलिसांनी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 06:03 PM2018-03-24T18:03:17+5:302018-03-24T18:03:17+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहर पोलीस ठाणे हद्दीतील गारमाळ परिसरातून रात्रीच्या सुमारास ट्रकमध्ये जनांवरे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत गारमाळ भागातून चाळीस जनांवरे घेऊन जाणारा ट्रक ताब्यात घेतला.
हिंगोली : हैद्राबाद येथील कत्तलखान्याकडे ४० जनावरे घेऊन जाणारा एक ट्रक पोलिसांनी शुक्रवारी (दि. २३ ) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पकडला. याप्रकरणी रात्री उशिराने हिंगोली शहर ठाण्यात चार आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहर पोलीस ठाणे हद्दीतील गारमाळ परिसरातून रात्रीच्या सुमारास ट्रकमध्ये जनांवरे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत गारमाळ भागातून चाळीस जनांवरे घेऊन जाणारा ट्रक ताब्यात घेतला. यावेळी जनावरांना निर्दयपणे डांबून नेले जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे ट्रकमधील एका जनावराचा मृत्यू झाला.
या प्रकरणातील दोघांना पोलिसांनी अटक केली असून चौकशी दरम्यान ही जनांवरे हैद्रबाद येथे कत्तलीसाठी नेली जात असल्याचे आरोपींनी सांगितले. पोलिसांनी ट्रक हिंगोली शहर ठाण्यात लावला असून जनावरेही ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक मैराळ यांच्या फिर्यादीवरून आरोपी एकबाल खाँन गफूर खाँन, केवल मोहन पुरी दोघे रा. मध्यप्रदेश, माजिद खाँ लियाकत खाँ, सलीम भाई दोघे रा. गुजरात या चौघांविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार तानाजी चेरले करीत आहेत.