पोलिसांनी ट्रक पकडला; तिघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:51 IST2018-09-02T00:51:31+5:302018-09-02T00:51:47+5:30
शहरालगतच्या गारमाळ परिसरातील बायपास अकोला-हिंगोली मुख्य महामार्गावर पोलिसांनी शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एक ट्रक पकडला. ट्रकसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी ट्रक पकडला; तिघे ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरालगतच्या गारमाळ परिसरातील बायपास अकोला-हिंगोली मुख्य महामार्गावर पोलिसांनी शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एक ट्रक पकडला. ट्रकसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी चौकशी केली जात आहे.
हिंगोली शहरालगतच्या गारमाळ परिसरातील हायवेपवर पेट्रोलिंग करताना पोलिसांना ट्रकची तपासणी केली. यावेळी ट्रकमधून दुर्गंधी येत असल्याने नेमके काय आहे हे निष्पन्न होऊ शकले नाही. ट्रकसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कसून चौकशी केली जात आहे. जनावरांची कातडी असावी, असा पोलिसांचा संशय आहे. यातील एक तुकडा तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, त्यानंतरच ट्रकमधून नेमकी कशाची वाहतूक केली जात होती, हे निषन्न होईल, असे हिंगोली शहर ठाण्याचे पोनि उदयसिंग चंदेल यांनी सांगितले. ट्रक क्रमांक आरजे-०९-जीसी-१०७० असा आहे.