‘त्या’ क्रूरकर्मा पित्यास पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:53 IST2018-12-31T00:52:45+5:302018-12-31T00:53:19+5:30

भांडणात मुलगा आईचीच साथ देतो या कारणामुळे स्वत:च्या मुलाचा खून करणाऱ्या क्रूरकर्मा पित्यास न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

The police brutally murdered him | ‘त्या’ क्रूरकर्मा पित्यास पोलीस कोठडी

‘त्या’ क्रूरकर्मा पित्यास पोलीस कोठडी

आखाडा बाळापूर : भांडणात मुलगा आईचीच साथ देतो या कारणामुळे स्वत:च्या मुलाचा खून करणाऱ्या क्रूरकर्मा पित्यास न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कळमनुरी तालुक्यातील येडशी येथील रहिवासी बाबूराव भगवानराव शिखरे याने स्वत:च्या पोटच्या पोराला क्रूरपणे ठार केले. शुक्रवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास नांदेड हिंगोली रोडवरील कुर्तडी फाट्यावरील रस्त्यावर पोराला आॅटोत आणून त्याने दोरीने गळफास दिला. त्यानंतर आॅटोवर आपटून व डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.
सातव्या वर्गात शिकणाºया वैभव बाबूराव शिखरे या तेरा वर्षे मुलाच्या खुनाच्या आरोपावरून बाळापुर पोलीस ठाण्यात कलम ३०२ अन्वये बाबूराव शिखरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासीक अंमलदार पोलीस निरीक्षक गणेश राहिरे, पोउपनि सविता बोधनकर, गजानन भालेराव, संतोष नागरगोजे, गजानन मुलगीर यांनी आरोपीस अटक केले. ३० डिसेंबर रोजी आरोपीस कळमनुरी येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोनि गणेश राहिरे यांनी दिली. या खुनाच्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. आखाडा बाळापूर परिसरात मुलाच्या निर्दयी खुनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. पित्याच्या या राक्षसी वृत्तीबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस निरीक्षक राहिरे यांनी रविवारी वेगवेगळ्या पद्धतीने खुनाच्या तपासाच्या दिशा ठरविल्या आहेत. पित्याच्या हस्ते मुलाचा निर्दयपणे खून झाला यात अन्य कोणी सामील होते काय, हा कटाचा भाग होता का? या दिशेनेही तपास सुरू असल्याची माहिती राहिरे यांनी दिली.

Web Title: The police brutally murdered him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.