पोलीस पाटील भरतीतही गुणवाढीचा गोंधळ ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:24 AM2018-05-18T00:24:38+5:302018-05-18T00:24:38+5:30
पोलीस पाटील भरती प्रक्रिया २०१७ मधील मुलाखतीच्या गुणदानात गोंधळ झाल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. औंढा तालुक्यातील १९ गावांतील उमेदवारांच्या तुलनात्मक तक्त्याचा त्यासाठी दाखला दिला असून चौकशी झाल्यास बिंग फुटू शकते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पोलीस पाटील भरती प्रक्रिया २०१७ मधील मुलाखतीच्या गुणदानात गोंधळ झाल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. औंढा तालुक्यातील १९ गावांतील उमेदवारांच्या तुलनात्मक तक्त्याचा त्यासाठी दाखला दिला असून चौकशी झाल्यास बिंग फुटू शकते.
औंढा तालुक्यातील पार्डी सा. येथील कविता निवृत्ती गिते यांना लेखी परीक्षेत सर्वात जास्त गुण आहेत. परंतु पोलीस पाटील भरती प्रकियेत उपविभाग वसमत येथे घेण्यात आलेल्या मौखिक परीक्षेत त्यांना जाणीवपूर्वक कमी गुण देऊन पोलीस पाटील निवडीपासून वंचित ठेवले. औंढा तालुक्यातील १९ गावांतील उमेदवारांबाबत असा प्रकार घडल्याचे सप्रमाण नमूद केले आहे. एक-दोन गावांत सर्वांत कमी गुण असलेल्याची निवड होणे कदाचित शक्य आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने झालेला प्रकार शंकास्पद आहे. इतरही तालुक्यांमधून एखाद-दुसरी तक्रार अशाच धाटणीची येत होती. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी यात समिती नेमण्याचीही मागणी होत आहे.