वाहतुकीला अडथळा करणाऱ्या चालकांना पोलिसांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:34 AM2021-09-14T04:34:36+5:302021-09-14T04:34:36+5:30

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे मुख्य रस्त्यावर वाहने उभी करून इतर वाहनांना अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी ...

Police hit drivers who obstruct traffic | वाहतुकीला अडथळा करणाऱ्या चालकांना पोलिसांचा दणका

वाहतुकीला अडथळा करणाऱ्या चालकांना पोलिसांचा दणका

googlenewsNext

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे मुख्य रस्त्यावर वाहने उभी करून इतर वाहनांना अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई १२ सप्टेंबर रोजी दुपारी करण्यात आली. या कारवाईमुळे रस्ता अडवून धरणाऱ्या चालकांना चांगलाच दणका बसला आहे.

कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर शहर हे मुख्य महामार्गालगत आहे. त्यामुळे दिवसभर याठिकाणी वाहनांची वर्दळ असते तसेच बाजारपेठेतही मोठी गर्दी असते. मात्र, महामार्गावरील जुने बसस्थानक, नवीन बसस्थानक, शेवाळा रोड, पेट्रोल पंप, बोल्डा रोड भागात अनेक प्रवासी वाहने रस्त्यावरच उभी करण्याची स्पर्धा लागत आहे. त्यामुळे अन्य वाहनांना अडथळा निर्माण होत होता. अखेर आखाडा बाळापूर पोलिसांनी रस्ता अडवून धरणाऱ्या वाहनचालकांना रविवारी चांगलाच दणका दिला. रस्त्याकडेला धोकादायकरित्या वाहने उभी करणाऱ्या चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात माधव चांदोजी थोरात (रा. कृष्णापूर), शेषराव मसनाजी भसनर (रा. पोत्रा), सलमान रमजान शेख (रा. शेवाळा रोड, आखाडा बाळापूर), शेषराव पुंजाजी शिंदे (रा. शेवाळा रोड, आखाडा बाळापूर), पवन विश्वासराव ढोकणे (रा. बोल्डा), कानबा कामाजी पिंपरे (रा. कवडा), एकनाथ पंडितराव पुलाते (रा. सापळी), दत्ता तुकाराम कवाने (रा. येहळेगाव तुकाराम), शेषराव तुकाराम सावंत (रा. डोंगरगाव पूल), सुरेश चांदू माखणे (रा. साळवा) अशा दहा चालकांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस कर्मचारी राजकुमार जमधाडे, सोपान थिटे, भारत डाखुरे, शिवाजी पवार, राजीव जाधव आदींच्या पथकाने केली.

Web Title: Police hit drivers who obstruct traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.