पोलिसांच्या तपासणीत पाच जण आढळले कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:29 AM2021-04-25T04:29:55+5:302021-04-25T04:29:55+5:30
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत अनेकजण विनाकारण फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. पोलिसांचे वाहन आल्यास विनाकारण फिरणारे नागरिक ...
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत अनेकजण विनाकारण फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. पोलिसांचे वाहन आल्यास विनाकारण फिरणारे नागरिक विविध कारणे सांगून पळवाट शोधत होते. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे हिंगोली ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. आर. बंदखडके यांनी विनाकारण फिरणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अचानक कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अकोला बायपास भागात ॲंटिजेन तपासणीसाठी पथक नियुक्त करण्यात आले. विनाकारण फिरणाऱ्यांना पकडून त्यांची कोरोना टेस्ट केली जात होती. यावेळी दुपारपर्यंत जवळपास १०४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये ५ जण कोरोनाबाधित निघाले. पोलीस कोरोना तपासणी करीत असल्याचे समजताच काही वेळातच या भागातील रस्ते सामसूम झाले. दरम्यान, यावेळी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनीही मार्गदर्शन करून सूचना केल्या. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे, डॉ. शेख जावेद, डॉ. सय्यद इम्रान अली, स्वाती कांबळे, प्रवीण भालेराव, ओम जाधव, शेषराव पोले, अशोक धामणे, राजेश ठोके, संग्राम सांगळे, शेख मोहमद, शेख रहिम यांच्यासह होमगार्डंनी कोरोना तपासणीसाठी पुढाकार घेतला.
फोटो : ५