उपचारासाठी आर्जव करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:37 AM2021-04-30T04:37:47+5:302021-04-30T04:37:47+5:30

हिंगोली / गोरेगाव : कोरोना उपचारासाठी छतावरून उडी मारून जीव देण्याची धमकी देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा अखेर २९ एप्रिल रोजी ...

Police officer dies | उपचारासाठी आर्जव करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू !

उपचारासाठी आर्जव करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू !

Next

हिंगोली / गोरेगाव : कोरोना उपचारासाठी छतावरून उडी मारून जीव देण्याची धमकी देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा अखेर २९ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस अधीक्षकांना उद्देशून असलेली त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. सचिन पांडुरंग इंगोले (वय ३५, रा. गणेशपूर, ता. जि. वाशिम) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

सचिन इंगोले यांची तब्येत बरोबर नसल्याने त्यांनी कोरोना तपासणी केली होती. यात ते पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांना २५ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथे योग्य उपचार मिळत नसल्याने प्रकृती खालावत चालली होती. त्यांच्या आई-वडिलांवरही उपचार सुरू होते. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांना उद्देशून मदत मागणारी ऑडिओ क्लिप दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. ‘एसपी साहेब... पोलीस दल व रुग्णालय प्रशासनाला मदत मागता मागता, माझा जीव जात आहे. माझ्यावर योग्य उपचार होत नाहीत. मी अनेकांना संपर्क केला. माझ्याकडे एक रुपया देखील नाही. तुम्ही सर्वजण फक्त येतो म्हणत आहात. मात्र कुणीही येत नाही. मला अस्थमाचा त्रास होत असून माझे वडीलदेखील रुग्णालयात भरती आहेत. साहेब, मी रुग्णालयाच्या टेरेसवरून माझा जीव देत आहे.’ अशी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.

त्यानंतर पोलीस व आरोग्य प्रशासन खडबडून जागे होत, उपचारासाठी सरसावले होते. मात्र २९ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास त्यांचा काेराेनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, सचिन इंगोले हे २०१८ पासून गोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Police officer dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.