पोलीस ठाण्यातील दस्ताऐवजाचे केले व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 08:00 PM2019-12-23T20:00:39+5:302019-12-23T20:01:25+5:30

गोपनियतेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल

Police station filed a complaint against one who make video recording of the secret document | पोलीस ठाण्यातील दस्ताऐवजाचे केले व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

पोलीस ठाण्यातील दस्ताऐवजाचे केले व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

Next

आडगाव रंजे (जि.हिंगोली) :  वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्यात २१ डिसेंबर  रोजी रात्री १० ते १०.३० वाजेच्या सुमारास तक्रार देण्यासाठी आलेल्या एकाने लपून-छपून ठाण्यातील दस्तावेजव साहित्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी त्या व्यक्ती विरोधात गोपनियतेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसमत तालुक्यातील मूळचा खांबाळा येथील व सध्या औंढा येथे वास्तव्यास असलेला आनंद सुभाष हटकर हा तक्रार देण्याच्या निमित्ताने हट्टा पोलीस ठाण्यात आला. पोलिसांना बोलत असताना त्याने स्वत:च्या खिशातील मोबाईल काढून पोलीस ठाण्यातील महत्त्वाचे  रेकॉर्ड व इतर साहित्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली. हा प्रकार लक्षात आल्याने त्याला पोलिसांनी लगेच पकडले. पोलिस कर्मचारी भागोराव दिंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे. तपास जमादार चव्हाण करीत आहेत.

Web Title: Police station filed a complaint against one who make video recording of the secret document

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.