पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:52 IST2018-07-29T00:51:37+5:302018-07-29T00:52:16+5:30
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची राज्य राखीव बल गट क्रमांक १ पुणे येथे समादेशकपदी नियुक्ती करण्यात आली. तर हिंगोली येथील समादेशक योगेश कुमार यांची हिंगोली पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची बदली
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची राज्य राखीव बल गट क्रमांक १ पुणे येथे समादेशकपदी नियुक्ती करण्यात आली. तर हिंगोली येथील समादेशक योगेश कुमार यांची हिंगोली पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.
गृह खात्याने नुकत्याच पोलीस अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. हिंगोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांची त्याच पदावर रायगड येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर हिंगोली अप्पर पोलीस अधीक्षपदी रायगड येथील संजयकुमार सुरगौडा पाटील यांची नियुक्ती केली. अरविंद चावरिया यांनी हिंगोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून दीड वर्ष कामकाज पाहिले. तर अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून सचिन गुंजाळ यांनी दोन वर्ष कर्तव्य बजावले. पोलीस अधीक्षक यांच्या कारकीर्दीत विविध गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या तपास पथकाने आवळल्या. तर राज्य राखीव पोलीस भरती घोटाळ्यातील आरोपींची कसून शोध मोहीम करून अनेकांना अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पथकाला मार्गदर्शन केले.