हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्याचा म्युकरमायकोसिसने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 07:54 PM2021-05-24T19:54:41+5:302021-05-24T19:55:04+5:30

हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले जमादार बोधेमवाड हे कोरोनाबाधित झाले होते.

Policeman dies of mucorrhoea in Hingoli | हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्याचा म्युकरमायकोसिसने मृत्यू

हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्याचा म्युकरमायकोसिसने मृत्यू

googlenewsNext

हिंगोली : हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यातील जमादार विनायक बोधेमवाड (४९) यांचे म्युकरमायकोसिस आजाराने २४ मे रोजी पहाटे औरंगाबाद येथे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांनी कोरोनावर मात केली होती.

हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले जमादार बोधेमवाड हे कोरोनाबाधित झाले होते. त्यामुळे त्यांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. मात्र ७ मे रोजी त्यांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. त्यांच्या नाकावर शस्त्रक्रियादेखील झाली होती. मात्र उपचार सुरू असतानाच २४ मे रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत जमादार बोधेमवाड हे दाताडा (ता.कंधार) येथील रहिवासी होते. परभणी पोलीस दलात ते भरती झाले होते. त्यांनतर ते हिंगोली पोलीस दलात दाखल झाले होते. त्यांनी वसमत, कुरुंदा, हट्टा, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
 

Web Title: Policeman dies of mucorrhoea in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.