राजकीय प्रगल्भतेचे दर्शन; आमदार राजू नवघरे यांच्याबद्दलच्या व्हायरल व्हिडीओचा सर्व स्तरातून होतोय निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 08:27 PM2021-10-13T20:27:35+5:302021-10-13T20:28:45+5:30

MLA Raju Navghare : अत्यंत उत्साहात व आनंदाचा क्षण असताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली.

political understanding ; The viral video about MLA Raju Navghare is being protested from all levels | राजकीय प्रगल्भतेचे दर्शन; आमदार राजू नवघरे यांच्याबद्दलच्या व्हायरल व्हिडीओचा सर्व स्तरातून होतोय निषेध

राजकीय प्रगल्भतेचे दर्शन; आमदार राजू नवघरे यांच्याबद्दलच्या व्हायरल व्हिडीओचा सर्व स्तरातून होतोय निषेध

googlenewsNext
ठळक मुद्देआमदार राजू पाटील नवघरे यांच्याकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनादर झाला असा आक्षेप घेण्यात आला.

वसमत  : वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आज दाखल झाला. शहरात दाखल होताना ट्रकमध्येच असलेल्या पुतळ्याची तालुक्याचे आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मात्र या वेळेचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (  The viral video about MLA Raju Navghare) करून आनंदाच्या क्षणात विघ्न घालण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. दरम्यान, पुतळा समिती व सर्व राजकीय पक्षांनी एकी दाखवत आमदार नवघरे यांना समर्थन देत या व्हायरल पोस्टचा तीव्र निषेध केला आहे. 

वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. पुतळा तयार होऊन आज वसमत शहरात दाखल झाला. ट्रकमधून हा पुतळा शहरात दाखल होताना  वाजतगाजत शिव उद्यानात हा पुतळा नेण्याचे ठरले. पुतळा समितीच्यावतीने मिरवणूक काढण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. मिरवणूक प्रारंभ होण्यापूर्वी  पुतळा समिती समिती व सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार राजू पाटील नवघरे यांना पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी वर चढवले. आमदार राजू पाटील नवघरे यांच्यासह सर्वच पक्षाचे नेते पदाधिकाऱ्यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर वाजत-गाजत मिरवणूक मार्गस्थ झाली. 

दरम्यान, अत्यंत उत्साहात व आनंदाचा क्षण असताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली. आमदार राजू पाटील नवघरे यांच्याकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनादर झाला असा आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले. आमदार नवघरे यांचा ही पुतळा उभारणीत मोठा वाटा असताना कोणीतरी खोडसाळपणे ही पोस्ट व्हायरल केल्याने वसमतकरांनी संताप व्यक्त केला. तसेच आमदार नवघरे यांनी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी देखील मागितली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. यानंतर आमदार राजू नवघरे यांच्या समर्थनार्थ भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर सर्वच पक्ष संघटनांनी उघड भूमिका घेऊन पोस्ट व्हायरल करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त केला. आमदाराच्या समर्थनार्थ सर्व पक्ष उघडपणे एकवटल्याने वसमत येथे राजकीय प्रगल्भतेचे दर्शन आज पाहावयास मिळाले. 

Web Title: political understanding ; The viral video about MLA Raju Navghare is being protested from all levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.