कोंढूर येथे नववधूने केले मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:17 IST2019-04-19T00:16:54+5:302019-04-19T00:17:11+5:30
तालुक्यातील कोंढूर येथील एका नववधूने लग्न झाल्यानंतर मतदानाचा हक्क बजावला.

कोंढूर येथे नववधूने केले मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : तालुक्यातील कोंढूर येथील एका नववधूने लग्न झाल्यानंतर मतदानाचा हक्क बजावला.
कोंढूर येथील रेखा देशमुख यांचा विवाह १८ एप्रिल रोजी दुपारी १२.१३ मिनिटांनी पार पडला. लग्नाचे सर्व विधी आटोपल्यानंतर नववधूने आपल्या वरासोबत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी तिने आपला मतदानाचा हक्क बजावला.
या नववधूने ४ वाजता मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.
यावेळी राजकुमार पतंगे काशीराम पतंगे, बाळासाहेब पतंगे, धोंडबाराव पतंगे, संतोष पतंगे, गजानन पतंगे, भगवान पतंगे आदी उपस्थित होते.