लोकसंख्येप्रमाणेच वाहनांचाही आकडा फुगतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:50 AM2018-09-18T00:50:35+5:302018-09-18T00:51:20+5:30
दिवसेंदिवस लोक सेख्येंबरोबरच वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. आज घडीला विविध रस्त्यांवरून १ लाख ६१ हजार ४७२ वाहने धावतात. यामध्ये सर्वाधिक दुचाकीची संख्या आहे. वाढत्या वाहनांमुळे अपघाताचा आकडाही फुगत चालला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दिवसेंदिवस लोक सेख्येंबरोबरच वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. आज घडीला विविध रस्त्यांवरून १ लाख ६१ हजार ४७२ वाहने धावतात. यामध्ये सर्वाधिक दुचाकीची संख्या आहे. वाढत्या वाहनांमुळे अपघाताचा आकडाही फुगत चालला आहे.
जिल्ह्यात नोंदणी न केलेली वाहनेही बिनदिक्तपणे धावत आहेत. आरटीओ कार्यालयाचे याकडे मात्र दुर्लक्ष आहे. त्यामुळे नोंदणीकृत नसलेली वाहने धावण्याचे प्रमाणही वाढत आहे. याकडे आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा वाहनचालकांवर कारवाई करणेही तितकेच गरजेचे आहे. जेणेकरून अपघाताचा आकडा फुगणार नाही. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार सध्या दुचाकीची संख्या १ लाख २३ हजार ३६० आहे. तर कार आणि जीपची संख्या १२ हजार १८०, आॅटोरिक्षा ३ हजार ८८१, पॅसेंजन वाहने ४१२, मोठे आणि छोटे ट्रक मिळून ७ हजार १५९, रूग्णवाहिका व ट्रक्टरसह इतर वाहनांची संख्या १३ हजार १८१ एकूण १ लाख ६१ हजार ४७२ वाहने जिल्ह्यातील विविध मार्गावरून दररोज धावत आहेत. वाहनांमध्ये सर्वाधिक संख्या दुचाकीची आहे. दुचाकीनंतर कार आणि जीपचा नंबर लागतो.
अपघातात दीड हजार लोकांचा मृत्यू...
मागील पाच वर्षांत रस्त्यावरील अपघातामध्ये जवळपास दीड हजार लोकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळेही अपघताला एका प्रकारे आमंत्रणच मिळत आहे. हिंगोली आरटीओ कार्यालय नोंदणीकृत वाहना व्यतीरिक्त दररोज जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील पासिंग हजारो वाहने धावतात. जिल्ह्यात मागील दहा वर्षापुर्वी वाहनांची संख्या केवळ ५९ हजार ५७३ होती. आणि आता वाहनांची संख्या दीड लाखाच्यावर पोहचली आहे. म्हणजे दहा वर्षांत वाहनांची दुप्पट संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.
फॅन्सी नंबरप्लेटकडे दुर्लक्ष
४जिल्ह्यातील विविध मुख्य रस्त्यावरून फॅन्सी नंबरप्लेट असलेली क्रमाकांची वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनाच्या नंबरप्लेटवर दादा, मामा, यासह विविध विचित्र प्रकारचे फॅन्सी क्रमांक पाहावयास मिळत आहे. त्यामुळे अशा वाहनांवर आरटीओ विभाग कार्यवाही करणार का? असा प्रश्न जनसामान्यांतून उपस्थित केला जात आहे. शिवाय विनापरवाना वाहन चालविणाºयांची संख्याही लक्षणिय आहे.